Positive Video: दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये मोठं सुख! चिमुकलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य जिंकतंय यूजर्स मन

Trending Video : हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) आली आहे. तर या दिवाळीत कोणातरी निस्वार्थ मदत नक्की करा, बघा ही दिवाळी तुम्हाला आयुष्यातील खऱ्या आनंद मिळवून देईल. 

Updated: Oct 15, 2022, 12:13 PM IST
Positive Video: दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये मोठं सुख! चिमुकलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य जिंकतंय यूजर्स मन title=
Positive Video young lady makeover to the poor girl Trending Video on Social media nmp

Positive News: आपण सोशल मीडियावर (Social media) अनेक व्हिडीओ (Video) पाहतो, काही धक्कादायक (Shocking video), अपघाताचे भयानक व्हिडीओ तर लहान मुलांचे प्राण्याचे व्हिडीओ...पण या सोशल मीडियावर असेही व्हिडीओ पाहिला मिळतात जे आपलं मन जिंकून घेतात. दिवसभरातील थकवा अशा एका व्हिडीओनंतर अगदी नाहीसा होतो. आयुष्य जगताना तुमची सुखाची कल्पना काय आहे? पैसा, प्रतिष्ठा की अजून काही...आम्हाला सांगा तुम्ही कधी कोणाला निस्वार्थपणे मदत केली आहे का? एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बघाच तुमची नक्कीच सुखाची कल्पनाच बदलून जाईल. 

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद (appreciate the little joys of life)

आयुष्य खूप छोटं आहे असं म्हणतात, आणि या आयुष्यात जगताना छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद दडलेला असतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली (kids) मुलगीचा आनंद गगणात मावतं नाहीय. झालं असं की, एका सलून समोर रस्त्यावर भूक मागून आपलं जीवन जगणारी गोंडस मुलगी येते आणि ती त्या सलूनच्या तरुणीला म्हणते की, तुमचे केस (hair) किती सुंदर आहेत, किती छान दिसता तुम्ही...त्या तरुणीच्या लक्षात येतं की या चिमुकलीला पैसा किंवा अन्नपदार्थ नकोय. ती तरुणी तिला विचारते तुला हवे असं केस..तिच्या चेहऱ्यावर आनंद (so happy) ओंसडून वाहत होता. (Positive Video young lady makeover to the poor girl Trending Video on Social media nmp)

जीवनाचा धडा शिकवणारा Video

आणि मग काय दारात आलेल्या चिमुकलीचं तरुणीनं रुपचं बदलून (makeover) टाकलं. त्यानंतर त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य थांबता थांबत नव्हतं. दुसऱ्यांना आनंद देऊन एकदा तरी बघा याशिवाय मोठं सुख नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून सलूनमधील तरुणीचं खूप कौतुक होतं आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) आली आहे. तर या दिवाळीत कोणातरी निस्वार्थ मदत नक्की करा, बघा ही दिवाळी तुम्हाला आयुष्यातील खऱ्या आनंद मिळवून देईल.