बायकोला उठवण्यासाठी या नवऱ्याने जे केलं, अशी हिंमत कोणीच करु शकणार नाही... पाहा व्हिडीओ

नवऱ्याने कितीही काही केलं तरी त्याला बायको समोर नमतं घ्याव लागतं.

Updated: Sep 4, 2021, 04:41 PM IST
बायकोला उठवण्यासाठी या नवऱ्याने जे केलं, अशी हिंमत कोणीच करु शकणार नाही... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : नवरा -बायकोच नातं हे असं नातं आहे की, ते दोघे ही एकमेकांसोबत खूप भांडतात आणि एकमेकांवर तेवढच प्रेम देखील करतात. कारण ते दोघे ही एकमेकांचे चांगले मित्र असतात. सोशल मीडियावर आपण नवरा बायकांचे व्हिडीओ नेहमीच पाहत असते, हे व्हिडीओ आणि व्हिडीओमधील त्यांचे भांडण हे खूपच मजेदार असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती त्याच्या बायकोला उठवण्यासाठी जी पद्घत वापरतो ती, मजेदार तर आहे, पण ती तशी धोकादायक देखील आहे.

नवरा-बायकोचं भांडण तर तुम्हाला माहितच आहे. नवऱ्याने कितीही काही केलं तरी त्याला बायको समोर नमतं घ्याव लागतं आणि कोणता ही नवरा हा बाहेर किती ही शेर असला, तरी तो आपल्या बायकोला घाबरतोच.

परंतु या व्हिडीओमध्ये थोडं वेगळं आहे. कारण या व्हिडीओमध्ये हा व्यक्ती चक्कं वाघीणीच्या तोडांतच हात घालण्याची हिंम्मत करतो. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, बायको सोफ्यावरती झोपलेली असते. तेवढ्यात तिचा नवरा येतो आणि तिच्या चेहऱ्यावरती काहीतरी फिरवतो, ज्यामुळे बायकोला वाटले की, कदाचित डास आला असावा म्हणून ती तिच्या चेहऱ्यावर डास उडवून लावण्यासाठी मारते. तिचा नवरा असं दोनवेळा करतो आणि तिसऱ्यांदा तो तिच्या चेहऱ्यावर अंड ठेवतो आणि पुन्हा बायकोच्या चेहऱ्यावर काहीतरी फिरतो.

परत डास आपल्या चेहऱ्यावरती बसले असल्यामुळे बायको जोरात, पुन्हा आपल्या चेहऱ्यावर मारते, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर तो अंड फुटतो आणि बायको झोपेतून खडबडून जागी होते. तेव्हा नवरा तिच्या पाठीमागे लपतो.

हा व्हिडीओ इथेच संपतो परंतु थोडा विचार करा या नवऱ्य़ाच नंतर काय झालं असेल, कारण त्याने चक्क वाघीणीच्या तोंडात हात घातला आहे. त्यामुळे आता तो जिवंत राहिल की, नाही हे तर त्यालाच ठाऊक.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर पती पत्नीच्या या मजेदार व्हिडीओला लोकांकडून खूप पसंती मिळत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 12 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लोक वेगवेगळे कमेंट्स देखील यावर करत आहेत. काही लोकांना तर आता त्या व्यक्तीसोबत पुढे काय झालं असेल याचीच चिंता लागून राहीली आहे. तर काही लोकांनी या व्यक्तीला खूपच सहासी असल्याचे सांगितले आहे.