धक्कादायक! वेदनेने विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेनं रस्त्यावरच...

अ‍ॅम्ब्युलन्सची वाट पाहून थकली, वेदनेने विव्हळत रूग्णालयात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का 

Updated: Jul 29, 2022, 09:41 AM IST
धक्कादायक! वेदनेने विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेनं रस्त्यावरच... title=

उत्तरप्रदेश : अ‍ॅम्ब्युलन्स अभावी अनेक रुग्णांनी जीव गमावल्याची अथवा रूग्णांची गैरसोय झाल्याची घटना तुम्ही ऐकल्या असतीलचं.मात्र या घटनेत अ‍ॅम्ब्युलन्स असुन सुद्धा एका प्रेग्नेट महिलेची गैरसोय झाल्याची घटना घडली आहे. या घटनेवर आता महिलेच्या कुटूंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील 28 वर्षीय सीमा काही दिवसांपूर्वीच रामवापूर गावातील राम सागर येथे आल्या होत्या. त्याच्या घरापासून कप्तानगंज हॉस्पिटल जवळ होते. प्रसुती वेदना झाल्यास वेळेत रूग्णालयात दाखल होत उपचार घेता येईल असा त्याचा मानस होता. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या ढीम्म कारभारामुळे महिलेची अपेक्षा धुळीस मिळाली. आणि तिला प्रसुती दरम्यान असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. 

मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास सीमा यांना प्रसूती वेदना होत होत्या. त्यामुळे राम सागर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 102 क्रमांकावर फोन केला. तेथून कप्तानगंज सामुदायिक आरोग्य केंद्रात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले. 

सीमा आणि रामसागऱ अ‍ॅम्ब्युलन्सची वाट पाहत होते. मात्र खुप वेळ होऊन सुद्धा अ‍ॅम्ब्युलन्सची आलीच नाही . सीमाच्या वेदनाही वाढत होत्या. अशा स्थितीत राम सागरने पत्नी पूनमसह सीमाला हातगाडीवर नेले. या दरम्यान रुग्णालयात पोहोचण्याआधीच  सीमाने हातगाडीवर मुलाला जन्म दिला. त्यानंतर लगेचचं हातगाडीवर सीमा आणि बाळाला घेऊन कप्तानगंज सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचला. 

रुग्णालय प्रशासनाचा ढिम्म कारभार
राम सागरने रुग्णालय परीसरात पोहोचताच तेथील चित्र पाहून धक्काच बसला. रूग्णालयाबाहेर अर्धा डझन हून अधिक रुग्णवाहिका उभ्या होत्या. त्यामुळे हा प्रकार पाहून कुटूंबिय संतापले होते. तसेच रुग्णालयात पोहोचताच दुसरा आणखीण एक धक्का बसला. रुग्णालयात एकही महिला डॉक्टर नव्हती. स्टाफ नर्ससह इतर सहकाऱ्यांनी तिच्यावर उपचार केले.रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आई आणि बाळावर मृत्यू ओढवण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने ते या घटनेतून बचावले आहेत.   

दरम्यान सध्या आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. बुधवारी सकाळी दोघांनाही रुग्णवाहिकेतून रामवापूर येथील त्यांच्या घरी नेण्यात आले आहे.  

कप्तानगंजचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोजकुमार चौधरी म्हणाले की, राज्य मुख्यालयातून रुग्णवाहिका पाठवण्याची व्यवस्था केली जाते. कॉल आल्यानंतर तेथून व्यवस्था करून रुग्णांना जवळच्या रुग्णालयात नेले जाते. तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापकाने डॉक्टरांना रुग्णवाहिकेच्या मागणीबाबत माहिती मिळाली नसल्याचे सांगितले होते.102 क्रमांकावर कॉल केल्यावर महिलेला कप्तानगंजच्या रुग्णवाहिकेचा आयडी मिळाला, मात्र ती कार खराब होती. गाडीच्या चालकाने 108 वर कॉल ट्रान्सफर केल्यावर हरैय्याहून गाडीची व्यवस्था करण्यात आली, पण ती वेळेवर पोहोचू शकली नाही.

कार्यवाहक सीएमओ डॉ. जय सिंह यांनी सांगितले की, डीएमने स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे. चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.