७० व्या प्रजासत्ताक दिनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा प्रमुख पाहुणे

 दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा प्रमुख पाहुणे

Updated: Jan 25, 2019, 04:00 PM IST
७० व्या प्रजासत्ताक दिनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा प्रमुख पाहुणे title=

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा हे आज दिल्लीत पोहोचले आहे. उद्या म्हणजेच २६ जानेवारीला भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात येणारे. यानिमित्त दिल्लीत होत असलेल्या परेडच्या कार्यक्रमात सिरील रामाफोसा हे मुख्य अतिथी असतील. आज दिल्लीत आल्यानंतर रामाफोसा यांनी राजघाट येथील महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. सिरिल रामाफोसा यांचं केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्वागत केलं.

राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना राष्ट्रपती भवन येथे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा २०१९च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. अर्जेंटिनात नुकत्याच पार पडलेल्या जी२० परिषदेत खुद्द पंतप्रधान मोदींनी सिरील रामाफोसा यांना प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण दिले होते.

२०१९ हे महात्मा गांधींचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे. महात्मा गांधी यांचं दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान आहे. आफ्रिकेतील वर्णद्वेषाचा महात्मा गांधींनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे महात्मा गांधींच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी सिरील रामाफोसा यांना खास आमंत्रण देण्यात आलं होतं. भारत-दक्षिण आफ्रिकेतील संबंध यामुळे आणखी मजबूत होणार आहेत. खरंतर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. पण त्यांनी हे आमंत्रण नाकारल्यानंतर सिरीज सामाफोसा यांना आमंत्रण देण्यात आलं.