पुलवामामध्ये सुरक्षा दलाकडून ५२ किलो स्फोटकं आणि ५० डेटोनेटर जप्त

दहशतवादी हल्लाचा कट भारतीय सेनेने उधळून लावला आहे.

Updated: Sep 18, 2020, 09:05 AM IST
पुलवामामध्ये सुरक्षा दलाकडून ५२ किलो स्फोटकं आणि ५० डेटोनेटर जप्त title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामाप्रमाणे आणखी एक दहशतवादी हल्ला करण्याचा कट भारतीय सेनेने उधळून लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेनेने पुलवामातील करेवा भागातून 52 किलो स्फोटकं आणि 50 डेटोनेटर जप्त केले आहेत. याद्वारे काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलावर मोठा हल्ला करण्याचा कट होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त सूचनेनंतर सेनेच्या 42 राष्ट्रीय रायफल्स यूनिट आणि पोलिसांनी मिळून पुलवामा जिल्ह्यातील करेवामध्ये संयुक्त शोध मोहिम सुरु केली. या शोधमोहिमेदरम्यान, महामार्गालगत जमिनीत एक सिंन्टेक्स टँक पुरलेला आढळला. 

हा टँक उघडल्यानंतर त्यात, 52 किलो हाय क्वालिटी स्फोटकं आणि 50 डेटोनेटर आढळले. हे सर्व सेनेकडून जप्त करण्यात आलं आहे.