ZEEL-SONY विलिनीकरणाच्या अंतिम टप्प्यात, पुनीत गोयंका म्हणाले...

ZEE-Sony merger आता अंतिम टप्प्यात, पाहा काय म्हणाले पुनीत गोयंका

Updated: Nov 24, 2021, 01:26 PM IST
ZEEL-SONY विलिनीकरणाच्या अंतिम टप्प्यात, पुनीत गोयंका म्हणाले... title=

नवी दिल्ली: ZEEL आणि सोनी विलिनीकरणावरून गेल्या काही दिवसात अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता सर्वकाही सुरळीत होत असून पुन्हा एकदा गाडी ट्रॅकवर आली आहे. इनवेस्कोने या विलिनीकरण होऊ नये म्हणून अनेक वेळा मोडते घालण्याचा प्रयत्न केला मात्र सगळे प्रयत्न अपयशी ठरले. 

ZEE-Sony merger: मीडिया आणि एन्टरटेनमेंट कंपनी Zee Entertainment Enterprises Ltd (ZEEL)चे मॅनेजिंक डायरेक्टर आणि CEO पुनीत गोयंका यांनी याबाबत माहिती दिली आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया सोबत प्रस्तावित विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

ZEEL- Sony यांचं विलिनीकरण अंतिम टप्प्यात पोहोचलं असून सगळंच आता ट्रॅकवर आहे. यामुळे आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला आता मोठा फायदा होणार आहे. 'मला खात्री आहे की या एकत्रीकरण संपूर्ण उद्योगाला मोठा फायदा होईल.' 

झी आणि सोनीच्या विलीनीकरणातून देशातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी तयार होणार आहे. आमचा रेव्हेन्यू स्टँडअलोन आधारावर सुमारे 2 अब्ज डॉलर्स असेल. विलीनीकरणानंतर कंपनीमध्ये देखील, सोनीला स्पोर्ट्ससह दुसऱ्या प्रीमियम कंटेंटमुळे गुंतवणुकीसाठी जास्त संधी मिळू शकते. 

ही संधी खूप मोठी
पुनीय गोयंका म्हणाले, "दोन्ही कंपन्यांचे व्यवसाय जवळजवळ उपलब्ध आणि काही प्रकरणांमध्ये ओव्हरलॅप आहे. झीने 2017 मध्ये सोनीला Ten Sports विकले. विलिनीकरणानंतर, स्पोर्ट्स जेनर नवीन कंपनीत परत येईल. ही खूप मोठी आणि चांगली संधी आहे. आता कंपनीमध्ये स्पोर्ट हा मोठा फोकस एरिया असणार आहे. भविष्यात टीव्ही आणि डिजिटलमध्ये मोठी गुंतवणूक होऊ शकते.

शेअर बाजार कंपनी होणार लिस्ट
झी एंटरटेनमेंट-सोनी पिक्चर्सच्या विलिनीकरणाची घोषणा 22 सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. झील-सोनी विलिनीकरणानंतर कंपनी 11,605.9 4 कोटी रुपये गुंतवणूक करेल. व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि सीईओ पुनीत गोयंकाच CEO राहणार आहेत.

विलीनीकरणानंतर, झी एंटरटेनमेंटमध्ये 47.07 टक्के हिस्सा असेल. सोनी पिक्चर्सकडे 52.9 3 टक्के हिस्सा असेल. विलीनीकरण कंपनी देखील स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केला जाईल.