Anant Ambani Engagement: राधिका मर्चंटच्या आईनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... सासूबाईंपेक्षा सुंदर आईचे सौंदर्य

Radhika Merchant Mother: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याला अंबानी कुटुंबियांसह बॉलिवूड तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती. 

Updated: Jan 20, 2023, 09:32 PM IST
Anant Ambani Engagement: राधिका मर्चंटच्या आईनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... सासूबाईंपेक्षा सुंदर आईचे सौंदर्य title=

Radhika Merchant Mother: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याला अंबानी कुटुंबियांसह बॉलिवूड तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती. त्यात अंबानींच्या लेकी-सुनांच्या सौंदर्याचीही (Shelia Merchant) पुष्कळ चर्चा रंगली होती. राधिका मर्चंटच्या सासूबाई नीता अंबानी या सौंदर्य हे लाखांत एक आहे. त्या कुठल्याही आऊटफिटमध्ये उठून दिसतात. परंतु यावेळी त्यांच्यापेक्षा जास्त लक्ष वेधून घेतले ते राधिकाच्या आईनं. सगळीकडे त्यांच्याच लुकची चर्चा सुरू होती. राधिका मर्चंट (Radhika Merchant) हिच्या आई आहेत तरी कोण? त्यांचे लेटेस्ट फोटो तुम्ही पाहिलेत का? सध्या हे फोटोज सगळीकडेच व्हायरल होत आहेत. (radhika merchant mother looks too beautiful with campare to her mother in law see photo)

नीता अंबानी यांची ओळख कुणालाच नवी नाही. त्यातून त्यांच्या सौंदर्याची ही सगळीकडेच चर्चा सुरू असते. त्यांच्याकडे आयपीएलच्या मुंबई भारतीय संघाची मालकी आहे. त्याचसोबत त्या रिलायन्सच्या अनेक कामांमध्ये आणि कार्यक्रमांमध्येही सहभागी होतात. त्या त्यांच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखल्या जातात. त्यांच्या सौंदर्याकडे पाहून त्यांच्या वयाचाही अंदाज येत नाही. त्या स्वत:ला खूप सुंदररीत्या कॅरी करतात. 

राधिका मर्चंट यांच्या आई शैला मर्चेंटही सौंदर्याच्या बाबतीत कमी नाहीत. त्यांच्या सौंदर्याचीही सध्या सगळीकडेच चर्चा आहे. त्यांच्या देसी लुकचाही (Desi Look) सगळीकडेच बोलबाला असतो. राधिकाच्या मेहेंदी सेरेमनीमध्ये तर सगळ्यांच्याच नजरा शैली मर्चेंट यांच्याकडेच वळल्या होत्या. त्यांचा मनमोहक देसी लुक यावेळी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. त्यांनी यावेळी जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. 

सध्या अंबानी कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. दोघांच्या प्री-एंगेजमेंट पार्टीचे सेलिब्रेशनही सुरू झाले आहे. इंटरनेटवर त्यांच्या एन्गेजमेंटचे फोटो व्हायरल होतं आहेत. एंगेजमेंटच्या आधी राधिका मर्चंटसाठी एक मेहंदी सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्यात अंबानी कुटुंबीय (Family) सहभागी झाले होते. 

शैला मर्चेंट यांचा हा रॉयल लुक खूपच व्हायरल झाला आहे. त्यांचा हा ड्रेस सिल्कचा होता तर त्यावर आकर्षक 3D डिझाईनही होते. सोबतचं त्यांनी मोत्यांच्या मणी आणि मार्कीज कटचा हिऱ्यांनी बनवलेला हार घातला होता तसेच कानात झुमके होते ज्यात त्या खूपच स्टनिंग दिसत होत्या. 

राधिकाच्या मेहेंदी समारंभात तिची मोठी बहीण अंजली मर्चंट देखील उपस्थित होती त्याही खूप सुंदर दिसत होत्या. अंजलीने स्वतःसाठी पेस्टल कलरचा शरारा सेट निवडला होता ज्याला वरच्या मांडीच्या लांबीच्या कुर्तीसोबत मॅचिंग बॉटम होता. आउटफिटवर थ्रेड एम्ब्रॉयडरी केली होती, जी मण्यांच्या वर्कनं सजलेली होती. सोबतच तिने चेहऱ्यावर न्यूड मेकअप केला होता ज्यामध्ये स्लीक लूकमध्ये केस मोकळे सोडले होते.