माफी मागण्याचा मुकेश अंबानींचा आदेश यांनी नाकारला...

जिओविरोधात बोलण्याऱ्यांबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना राग येतो.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 28, 2018, 04:31 PM IST
माफी मागण्याचा मुकेश अंबानींचा आदेश यांनी नाकारला... title=

नवी दिल्ली : जिओविरोधात बोलण्याऱ्यांबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना राग येतो. त्यांचा हा राग त्यांनी बार्सिलोनामध्येही व्यक्त केला. हे प्रकरण रिलायन्स जिओ आणि सेल्युलर ऑपरेटर ऑफ इंडियाशी संबंधित आहे. मुकेश अंबानींनी COAI च्या विरोधात मानहानीचा आरोप केला आहे. मात्र COAI ने जिओची माफी मागण्यास नकार दिला आहे. COAI चे डिरेक्टर राजन मैथ्यूज यांनी सांगितले की, माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. 

मतभेद कंपनीविरोधात नाहीत

इकोनॉमिक टाईम्सच्या प्रकाशित वृत्तानुसार, बार्सिलोनामध्ये चालत असलेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेसमध्येही COAI आणि जिओत चालू असलेल्या वादाचे दर्शन झाले. राजन यांनी सांगितले की, जिओने दिलेल्या मानहानीच्या नोटीसेवर माफी मागण्याचा काही प्रश्नच येत नाही. पुढे ते म्हणाले की, COAI चे जे काही मतभेद आहेत ते ट्रायने दिलेल्या आदेशांविरोधात आहे. कोणत्याही कंपनीविरोधात नाही. त्यामुळे माफी मागण्याचा काही प्रश्नच येत नाही.

राजन मैथ्यूज म्हणाले..

राजन मैथ्यूज यांनी सांगितले की, एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया यांसारख्या कंपन्यांच्या जून्या किंमतींवर जिओला फायदा मिळण्यासाठी ट्रायने नियमात बदल केले. त्यानंतर जिओने COAI च्या विरोधात मानहानीची नोटीस जाहिर केली. मुकेश अंबानींच्या जियोने COAI ला ४८ तासात उत्तर देण्यास सांगितले होते. मात्र COAI च्या डिरेक्टरने असे करण्यास नकार दिला.

काय आहे पूर्ण प्रकरण?

नवीन ऑपरेटर्सला फायदा मिळण्यासाठी ट्रायने अनेक नवी पाऊले उचलली आहेत, असा आरोप COAI ने केला. सर्वात अधिक वाद ट्रायच्या प्रिडेट्री प्रायसिंगला घेऊन झाला. याअंतर्गत ट्रायने इंटर कनेक्टिव्ही यूजेज चार्जला कमी करण्यासाठी किंमत १४ पैसे प्रति मिनीट केले आहेत. एअरटेल, वोडाफोन आणि आयडियाने देखील याचा थेट फायदा जिओला मिळत असल्याचा आरोप केला आहे.