राजस्थानात बस - जीप अपघात १३ ठार, १० गंभीर जखमी

 बालेसरजवळ मिनी बस आणि जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

ANI | Updated: Sep 27, 2019, 05:42 PM IST
राजस्थानात बस - जीप अपघात १३ ठार, १० गंभीर जखमी title=

जोधपूर : राजस्थान राज्यात बालेसरजवळ मिनी बस आणि जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात १० जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अपघात आज दुपारी घडला आहे. दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने गाड्यांचा चेंदामेंदा झाला.

या भीषण अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी जखमींना तातडीने बालसेर येथील रूग्णालयात दाखल केले. हा अपघात एवढा भीषण होता की, यातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

मिनी बस जैसलमरकडे जात होती. यावेळी समोर भरधाव येणाऱ्या जीपला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर गाड्यांचा चक्काचूर झाल्याने दोन्ही वाहनांमधील प्रवासी आतच अडकलेले होते. त्यामुळे त्यांना मदत मिळण्यास अडचण झाली. त्यामुळे मृतांची संख्या वाढल्याची माहिती पुढे आली आहे.