रजनीकांतच्या पक्षाचं 'ब्लू बूक'... जाती-धर्माला नो एन्ट्री!

कार्यकर्त्यांनी काय करावं आणि काय करू नये, याच्या स्पष्ट शब्दांत सूचना

Updated: Aug 30, 2018, 01:10 PM IST
रजनीकांतच्या पक्षाचं 'ब्लू बूक'... जाती-धर्माला नो एन्ट्री! title=

चेन्नई : तमिळ सिनेमाचा सुपरस्टार आणि राजनेता रजनीकांत यांनी आपल्या पक्षासाठी एक खास रणनीती तयार केलीय. यासाठी रजनीकांतकडून 'ब्लू बूक' नावाचं एक पुस्तकच जाहीर करण्यात आलंय... पक्ष बनवण्यासाठीचे नियम यात जाहीर करण्यात आलेत. रजनी मक्कल मंडरामच्या (आरएमएम / रजनी फॅन असोसिएशन) उप-कायद्यांचा हा एक भाग आहे. या पुस्कात पक्षाचे विचार आणि कार्यकर्त्यांसाठी खास सूचना केल्या आहेत. रजनीनं फॅन्स आणि सामान्यांच्या भावना लक्षात घेत हे नियम तयार केलेत. कार्यकर्त्यांनी काय करावं आणि काय करू नये, याच्या स्पष्ट शब्दांत सूचनाच या पुस्तकात करण्यात आल्यात. 

जवळपास नऊ महिन्यांपूर्वी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणाऱ्या रजनीकांतनं या पुस्तकात एकूण 25 मुख्य भाग आहेत. या पुस्तकातील एक नियम आरएमएमला इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळा करतो. यात म्हटलं गेलंय, आम्हाला एक प्रामाणिक राजकारण करायचंय ज्यात कोणत्याही जाती, पंथ, भाषा किंवा तत्सम प्रकारांना जागा नसेल. त्यामुळे, जे लोक कोणत्याही जातीवर आधारित संघटनेशी किंवा धार्मिक संघटनांशी निगडीत आहेत त्या आरएमएममध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. पुस्तकावर गंभीर दिसणाऱ्या रजनीकांतचा एक फोटोही आहे. 

याआधी अभिनेता कमल हसननंही मक्काल निधि मैयम (एमएनएम) नावानं एक राजकीय पक्ष उभारलाय.