राज्यसभा खासदार सुभाषचंद्रांंचा 'एन्टरप्रेनर ऑफ द डिकेड' पुरस्काराने गौरव

राज्यसभा खासदार सुभाषचंद्रा यांना बुधवारी बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन द्वारा 'एन्टरप्रेनर ऑफ द डिकेड' या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Updated: Feb 22, 2018, 04:52 PM IST
राज्यसभा खासदार सुभाषचंद्रांंचा  'एन्टरप्रेनर ऑफ द डिकेड' पुरस्काराने गौरव  title=

मुंबई : राज्यसभा खासदार सुभाषचंद्रा यांना बुधवारी बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन द्वारा 'एन्टरप्रेनर ऑफ द डिकेड' या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

सुभाषचंद्रा यांच्यावतीने झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज़ेज लिमिटेड (ZEEL)चे एमडी आणि सीईओ पुनीत गोएंका यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

सुभाषचंद्रा उत्तरप्रदेशात असल्याने अनुपस्थित

सुभाषचंद्रा यूपी इन्‍वेस्‍टर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात आहेत. त्यामुळे ते पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहू शकले नाही. सुभाषचंद्रांच्या आधी मुकेश अंबानी, रतन टाटा, कुमार मंगलम बिर्ला, अनिल अग्रवाल आणि उद्य कोटक या पाच मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

अन्य मानकरी कोण ? 

बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन आयोजित या सोहळ्यात अन्य मान्यवरांनी इतर पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 

 एएम नाईक (लार्सन अ‍ॅन्ड ट्रुब्रो ग्रुप चेअरमॅन) - लाइफ टाइम अचीवमेंट पुरस्कार
 
 भास्कर भट्ट  ( टायटन कंपनीचे एमडी आणि सीईओ ) - मॅनेजमेंट मॅन ऑफ द ईयर
 
 डॉ.आनंद देशपांडे (परसिस्टेंट सिस्टम लिमिटेड फाउंडर चेअरमॅन आणि एमडी) - एन्टरप्रेनर ऑफ द इयर 

ऊषा अनंतसुब्रम्णयम ( इलाहाबाद बॅंक  एमडी आणि सीईओ ) - मॅनेजमेंट वुमेन अचीवर ऑफ द ईयर

शशिकांत सूर्यनारायणन (सेडेमैक मेक्ट्रोनिक्स (Sedemac Mechatronics) फाऊंडर चेअरमॅन) -  स्टार्टअप मॅन ऑफ द ईयर 

सब्यसाची मुखर्जी (छत्रपति शिवाजी महाराज वास्तु संग्रहालयाचे सचिव) -  ज्यूरी स्पेशल मेंशन ऑफ द ईयर 

स्वतंत्र ज्युरी पॅनल 

सार्‍या पुरस्कारांसाच्या निवडीसाठी खास आणि स्वतंत्र ज्युरी पॅनल  होतं. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर होते. या पॅनलमध्ये  हरिभक्ती ग्रुपचे चेयरमॅन शैलेश हरिभक्ती, डेलोटी हस्किंस अ‍ॅन्ड सेल्स एलएलपीचे चेयरमॅन पीआर रमेश यांचा समावेश होता. 

कशाच्या आधारे झाली निवड ?  

विजेत्यांची निवड अनेक कंपनींची बॅलन्स शीट, प्रशासन व्यवस्था, समाज आणि पर्यावरण क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहून करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून बॅंक ऑफ बडोदाचे चेअरमॅन रवी वेंकटेशन यांनी हजेरी लावली होती.