हनीप्रीतवर कमेंट करायचे डेरेवाले, राम रहीम करत होता हे काम

 दोन साध्वींच्या बलात्काराच्या आरोपात २० वर्ष शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमबद्दल रोज नव-नवीन खुलासे होत आहे. राम रहीमचे जुने डेरा समर्थक त्याचे काळे कारनामे हळूहळू उघड करत आहे. 

Updated: Sep 8, 2017, 02:47 PM IST
 हनीप्रीतवर कमेंट करायचे डेरेवाले, राम रहीम करत होता हे काम  title=

नवी दिल्ली :  दोन साध्वींच्या बलात्काराच्या आरोपात २० वर्ष शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमबद्दल रोज नव-नवीन खुलासे होत आहे. राम रहीमचे जुने डेरा समर्थक त्याचे काळे कारनामे हळूहळू उघड करत आहे. 

बाबा जेल गेल्यानंतर त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत इंसा उर्फ प्रियंका तनेजा बेपत्ता आहे. पोलिसांनी तिच्या विरूद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे. हरियाणा पोलीस तिचा शोध घेत आहे. तसेच त्यांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे, तरी त्यांना यश मिळालेले नाही. 

हनीप्रीत आणि राम रहीम यांच्या संबंधांबाबत अनेक धक्कादायक किस्से समोर आले आहे. यात अशीही माहिती समोर आली की डेऱ्यातील काही साधू आणि डेरा प्रेमी हनीप्रीतला पाहून शिट्ट्या मारायचे. तसेच तिच्यावर अनेक प्रकारचे कमेंटही करायचे. 

एका टीव्ही चॅनलच्या रिपोर्टनुसार जेव्हा हनीप्रीत चित्रपटांचे शुटींग करून डेरा मुख्यालयात पोहचायची तेव्हा तिच्यावर डेराप्रेमी कमेंट करायचे. तिला पाहून गाणेही गात होते. 

चॅनलला माजी डेरा प्रेमी हंसराज यांनी सांगितले की २०११ मध्ये पंजाबी फिल्म यार अनमुल्ले'तील जट टिन्का गाण्यात प्रियंकाचा उल्लेख येत असे. त्यावेळी लोक हनीप्रीतला पाहून हे गाणे गायचे आणि तिला छेडायचे. त्यामुळे तिचे नाव बदलून हनीप्रीत ठेवले. बाबा राम रहीमला कोणी त्याच्या मानलेल्या मुलीला अशा प्रकारे त्रास देणे पसंद नव्हते. 

राम रहीम डेऱ्याच्या बाहेर जायचा तेव्हा नेहमी हनीप्रीतला सोबत घेऊन जायचा. डेऱ्यात तिला कोणी त्रास देऊन नये म्हणून तो असे करायचा.  काही दिवसांपूर्वी एका चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हनीप्रीतच्या शेजारी राहणाऱ्याने दावा केला केली राम रहीम आणि हनीप्रीत यांची ओळख ती शाळेत असताना पासून झाली होती. हनीप्रीत आणि राम रही एक दुसऱ्याच्या संपर्कात लग्नाच्या अगोदरपासून आले होते. फतेहाबाद येथे हनीप्रीतच्या साखरपुड्याला राम रहीम आला होता.