VIDEO : रानू मंडल अडकली विवाहबंधनात?, वधूच्या वेषात पाहून नेटकरी हैराण

Viral Video : सोशल मीडियावर रानू मंडलचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. बॉयफ्रेंडसोबत रोमँन्टिक अंदाजात पाहिल्यानंतर आता रानू मंडलचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. वधू वेषात रानू मंडलला पाहून नेटकरी हैराण झाले आहे.   

Updated: Jan 9, 2023, 04:08 PM IST
 VIDEO : रानू मंडल अडकली विवाहबंधनात?, वधूच्या वेषात पाहून नेटकरी हैराण title=
Ranu Mandal get married Bride Trending Video Viral on Social media marathi news

Ranu Mondal Bride Trending Video : सोशल मीडियावर अचानक एका रात्रीत स्टार झालेली रानू मंडल कोणाला माहिती नाही, असा आज एक व्यक्ती सापडणार नाही. पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशनवर गाताना रानूचा व्हिडीओ (Ranu Mondal Video) बनविण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला. अनेकांनी रानू मंडलची तुलना गायनकोकिळा आशा भोसले यांच्याशी केली. त्यानंतर रानू हिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही दिवसांपूर्वी बाइकवर बॉयफ्रेंडसोबत रोमान्स (Romance Video) करताना दिसून आली. रानूने प्रेमात पडली अशी चर्चा रंगली. रानू मंडलने बॉयफ्रेंड (boyfriend) लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

रानू मंडल अडकली विवाहबंधनात?

नेटकरी हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत, कारण या व्हिडीओमध्ये रानू वधूच्या वेषात दिसतं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे की, रानू मंडलने लग्न केलं आहे. या व्हिडीओमध्ये रानू मंडल बंगाली नवरी दिसतं आहे. लाल साडी, लाल चुडा आणि मेकअप करुन रानू मंडल लग्नासाठी सजल्या आहेत. या व्हिडीओसाठी रानूने ये क्या हुआ कैसे हुआ हे गाणं गायलं आहे. (Ranu Mandal get married Bride Trending Video Viral on Social media marathi news)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jayita Das (@jayita_das15)

हा व्हिडिओ जयिता दासने काही हॅशटॅगसह शेअर केला आहे आणि त्याला लाखो व्ह्यूज आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. दरम्यान नेटकऱ्यांनी तिच्या मेकअपची खिल्ली उडवली आहे. ती या वेशात भयंकर दिसतं आहे, असं म्हटलं आहे. यापूर्वी रानूने 2019 मध्ये हिमेश रेशमियाने तिच्याकडून 3 गाणी रेकॉर्ड करुन घेतली होती. पण प्रेक्षकांनी त्या गाण्याला पसंती दिली नाही. या गाण्यापैकी फक्त तेरी मेरी कहाणी हेच गाणं थोडंफार लोकांना आवडलं होतं. पण रानूला फिल्मजगतात काही एण्ट्री मिळाली नाही. आज ती सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ तयार करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्याचं प्रयत्न करत आहेत.