जगप्रसिद्ध 'फोर्ब्स'च्या यादीत डोनाल्ड ट्रम्पसह ३ भारतीयांची नावे

जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मासिकाने जगविख्यात असलेल्या १०० व्यावसायिकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्कृष्ठ व्यावसाय करणाऱ्या ३ भारतीय नावांचाही समावाश आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 20, 2017, 09:15 PM IST
जगप्रसिद्ध 'फोर्ब्स'च्या यादीत डोनाल्ड ट्रम्पसह ३ भारतीयांची नावे title=

न्यूयॉर्क : जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मासिकाने जगविख्यात असलेल्या १०० व्यावसायिकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्कृष्ठ व्यावसाय करणाऱ्या ३ भारतीय नावांचाही समावाश आहे.

लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला अशी या तीन व्यावसायिकांची नावे आहेत. हे तीनही व्यावसायीक फोर्ब्सच्या यादीनुसार लिविंग लिजेंड्स आहेत. या तिघांपैकी लक्ष्मी मित्तल हे आर्सेल मित्तलचे चेअरमण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद चेअरमन आहेत. तर, विनोद खोसला हे सन मायक्रोसिस्टमचे सह-संस्थापक आहेत. विशेष असे की, या यादीत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव आहे.

दरम्यान, या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस, वर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रानसन, बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरन बफेट, मायक्रोसॉफ्टचे सह-संपादक बिल गेट्स आणि न्यूज कॉर्पोरेशनचे कार्यकारी चेअरमन रूपर्ड मरडॉक यांच्या नावाचाही समावेश आहे.