HDFC बँकेसंबंधी RBI चा मोठा निर्णय, Yes Bank च्या शेअर्समध्ये मोठी उसळी

Yes Bank Share Price: आज मार्केट सुरु होताच येस बँकेच्या शेअर्समध्ये (Yes Bank Shares)10 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एचडीएफसी (HDFC) बँकेला येस बँकेची 9.5 टक्के भागीदारी खरेदी करण्यास मंजुरी दिली असल्याने ही वाढ पाहायला मिळाली.   

शिवराज यादव | Updated: Feb 6, 2024, 11:41 AM IST
HDFC बँकेसंबंधी RBI चा मोठा निर्णय, Yes Bank च्या शेअर्समध्ये मोठी उसळी title=

Yes Bank Share Price: मंगवारी सकाळी मार्केट सुरु होताच येस बँकेच्या शेअर्समध्ये (Yes Bank Shares)10 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. शेअर्सने मोठी झेप घेण्यामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (Reserve Bank of India) एक निर्णय कारणीभूत ठरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एचडीएफसी (HDFC) बँकेला येस बँकेची 9.5 टक्के भागीदारी खरेदी करण्यास मंजुरी दिली असल्याने ही वाढ पाहायला मिळाली. सकाळी 9 वाजून 49 मिनिटांनी येस बँकेचा शेअर 10.31 टक्के वाढीसह 25 रुपये 15 पैशांवर ट्रेड करत होता. 

येस बँकेचा शेअर मागील सत्रात तो 22.80 रुपयांवर बंद झाला होता आणि आज 23.02 रुपयांवर सुरु झाला. या शेअर्सची 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी 26.25 रुपये आहे आणि सर्वात कमी पातळी 14.10 रुपये आहे. 

दुसरीकडे, एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये घट पाहायला मिळत असून, त्यासह ट्रेड करत आहे. तो 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह 1441 रुपयांवर आहे. सुरुवातीच्या व्यवहारात तो 1436.30 रुपयांपर्यंत घसरला होता. येस बँकेने भागधारकांना दिलेल्या माहितीत असं म्हटलं आहे की, बँकेला आरबीआयकडून ५ फेब्रुवारीला माहिती मिळाली आहे की बँकेने एचडीएफसी बँकेच्या बँकेतील 9.5 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

यादरम्यान, एचडीएफसी बँकेने इंडसइंड बँकेतील 9.5 टक्के भागीदारी खरेदीसाठी आरबीआयच्या मंजुरीवर स्पष्टीकरण दिलं आहे. बँकेने सांगितलं आहे की, हे एचडीएफसी बँकेला लागू होत नसून एचडीएफसी बँक समूहाशी संबंधित प्रकरण  आहे. यामुळे इंडसइंड बँकेचे शेअर्सही सुरुवातीच्या व्यवहारात वधारले आणि 1548.90 रुपयांवर पोहोचले. 10.30 वाजता तो 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 1515.80 रुपयांवर ट्रेड करत होता. HDFC बँक ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे.

HDFC बँकेने FD वरील व्याजदर वाढवला

देशातील सर्वात मोठी खासही बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. 2 कोटींपेक्षा अधिक आणि 5 कोटींपर्यंतच्या एफडी बल्क एफडी म्हटलं जातं. एचडीएफसी बँकेने 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या बल्क एफडी ऑफर करत असून बदललेले दर 3 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाल्या आहेत. 

बँकेकडून 1 वर्षांपासून ते 15 महिन्यांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. बँक या एफडीवर 7.40 टक्क्यांचं व्याज देत आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के व्यात देत आहे.