RBI ने राज्यातील 'या' बँकेला ठोठावला जबर दंड; तुमचेही खाते आहे का?

RBI Penalty | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मुंबई आणि गाझियाबाद येथील बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे मध्यवर्ती बँकेच्या वतीने हा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईचा बँकेच्या ग्राहक सेवेवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही.

Updated: May 10, 2022, 10:32 AM IST
RBI ने राज्यातील 'या' बँकेला ठोठावला जबर दंड; तुमचेही खाते आहे का? title=

मुंबई : RBI Penalty : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल दोन बँकांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. यातील एक बँक मुंबईची आणि दुसरी गाझियाबादची आहे. मुंबईस्थित अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेला अनेक निर्देशांची अंमलबजावणी न केल्याबद्दल 58 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दंड का ठोठावला?

एनपीएशी संबंधित नियमांकडेही बँकेकडून दुर्लक्ष करण्यात आले. या सर्व बाबींचा तपास झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने अभ्युदय सहकारी बँकेला दंड ठोठावण्यात आला.

रिझर्व्ह बँकेने आणखी एका बँकेला दंड ठोठावला आहे. गाझियाबाद येथील नोएडा कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेलाही 'बँकिंग नियमन कायदा, 1949' च्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ग्राहकांशी संबंधित सेवा सुरळीत

नियामक नियमांमधील हलगर्जीपणामुळे दोन्ही बँकांना दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले. या कारवाईचा बँकिंग सेवेशी काहीही संबंध नाही. अशा परिस्थितीत बँकेकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा सुरू राहतील.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात, आरबीआयने बँक ऑफ महाराष्ट्रला 1.12 कोटींचा दंड ठोठावला होता. KYCआणि इतर सूचनांचे पालन करण्यात चूक केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेच्या वतीने हा दंड ठोठावण्यात आला आहे.