RBI MPC Updates : महागाईचा फटका सामान्यांना बसत असताना RBI कडून मोठा दिलासा

सामान्यांना मोठा दिलासा

Updated: Oct 8, 2021, 11:19 AM IST
RBI MPC Updates : महागाईचा फटका सामान्यांना बसत असताना RBI कडून मोठा दिलासा  title=

मुंबई : RBI MPC Updates : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी शुक्रवारी मॉनेटरी पॉलिसीची घोषणा केली. MPC ने पॉलिसी दरात कोणताच बदल केलेला नाही. रेपो रेट (Repo Rate) 4 टक्केच आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, कमिटीनने एक मताने पॉलिसी दरात काहीच बदल केलेला नाही. रिवर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर स्थिर आहे. तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट (MSFR) आणि बँक रेट 4.25 टक्के आहे. रिझर्व बँक गव्हर्नरने पॉलिसी अकोमोडेटिवर ठेवलं आहे. केंद्रीय बँकेने तब्बल 8 वेळा व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. 

सलग 9 व्यांदा रेपो रेटमध्ये बदल नाही सलग 9 वी वेळ आहे की रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मे 2020 मध्ये रेपो दर कमी केला होता. रेपो रेटची ही पातळी एप्रिल 2001 नंतरची सर्वात कमी पातळी आहे.

काय असतं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट?

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ज्या दराने बँकांना कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात. या कर्जाद्वारे बँका त्यांच्या ग्राहकांना कर्ज देतात. म्हणजेच, जेव्हा रेपो दर कमी असतो, कर्जावरील व्याजदर कमी असतात आणि जेव्हा रेपो दर वाढतो, तेव्हा बँका व्याजदर वाढवू शकतात. दुसरीकडे, रिव्हर्स रेपो रेट रेपो रेटच्या अगदी विरुद्ध आहे आणि हा दर आहे ज्यावर आरबीआय बँकांकडून ठेवींवर व्याज देते. बाजारातील रिव्हर्स रेपो रेटद्वारे नियंत्रित केली जाते.