Sex On The Beach : 'सेक्स ऑन दी बीच' आता घरीच बनवू शकता, अवघ्या 3 मिनिटात

Sex On The Beach : नाव ऐकून तुम्हाला थोडीसी वेगळी वाटली असेल ही रेसिपी पण एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हीच ठरवा, नावाला साजेशी आहे की नाही... 

Updated: Feb 16, 2023, 05:05 PM IST
Sex On The Beach : 'सेक्स ऑन दी बीच' आता घरीच बनवू शकता, अवघ्या 3 मिनिटात  title=

Sex On The Beach Recipe  : आपण जर कुठे बाहेर हॉटेल रेस्टोरेंट मध्ये गेलो तर, मेन्यू कार्ड पाहताना त्यातील काही पदार्थांची नाव वाचूनच आपल्याला ती फार गंमतीशीर वाटतात. काहीवेळेला तर फारच अतरंगी नाव ठेवलेली असतात, ती वाचून हा पदार्थ खरचं नावाप्रमाणे असेल का ? असा विचार करून कुतूहलापोटी आपण तो पदार्थ ऑर्डर करतो. जेव्हा तो पदार्थ किंवा डिश आपल्यासमोर येते ते पाहून आपणही चक्रावून जातो. कारण, नावाप्रमाणे ती डिश नसतेच मुळी.

असचं काहीस घडलंय, 'सेक्स ऑन दि बीच'  या मॉकटेल (Sex on the beach recipe) विषयी.  नाव ऐकून डोळ्यासमोर बराच काही आलं असेल, पण त्याआधी जरा थांबा या हटके नावाच्या डिशविषयी चला जाणून घेऊया आणखी बराच काही. आणि तुम्हालाही ही आगळी वेगळी डिश घरी बनवून बघायची असेल तर सोपी आणि झटपट रेसिपी आज पाहून घ्या . (Sex on the beach recipe at home

भारतात मद्यप्रेमींची संख्या कमी नाहीये. त्यात मॉकटेल आणि कॉकटेल (mocktail, cocktail ) पिणारेसुद्धा भरपूर आहेत. 'सेक्स ऑन दि बीच' हा प्रकार मॉकटेलमध्ये मोडतो. अनेक प्रकारच्या अल्कोहोलिक ड्रिंक्ससोबत हा मॉकटेल (Sex on the beach recipe)  तयार केला जातो. वोडका पासून बनवलेल्या या मॉकटेलमध्ये (mocktail) अनेक प्रकारच्या फ्रुट पंचचा (fruit punch) उपयोग केला जातो. सेक्स ऑन दि बीच बनवण्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे वोडका.मग त्यात पीच श्नेप्स, ऑरेंज ज्यूस, क्रॅनबेरी ज्यूस, घालून एक रिफ्रेशिंग आणि चवीला एकदम भारी असं ड्रिंक तयार होतं. 

या ड्रिंकला हे नाव मिळण्यामागे एक मस्त स्टोरी आहे, 1987 मध्ये एका हॉटेलचं प्रमोशन होतं त्यावेळी त्या हॉटेलच्या बारटेंडरने हे ड्रिंक पहिल्यांदा बनवलं होतं. समुद्रकिनारी म्हणजे बीचवर हे ड्रिंक ऑर्डर केलं जायचं. आणि फ्लोरिडाच्या समुद्रकिनारी येणारे लोक दोन गोष्टींकडे फार आकर्षित होते ते म्हणजे बीच म्हणजे समुद्र किनारा आणि दुसरा म्हणजे सेक्स  (sex). हॉटेल शेफने या ड्रिंक च नाव त्याच नावावरून ठेवलं.  आणि अनोखं नाव पाहता त्याची मागणी खुप वाढली. 

Sex on the Beach बनवण्याची रेसिपी

हे कॉकटेल बनवणं अतिशय सोपं आहे. काही ठिकाणी आवडीनुसार ऑरेंज ज्यूसऐवजी पाईनअँपल ज्युसचा वापर केला जातो.  यासाठी 45 ml  वोडका , 30 मिली पीच सेनेत, 45  मिली ऑरेंज ज्यूस, 45  मिली क्रॅनबेरी ज्यूस, एकत्र घ्या आणि त्यात बर्फ घाला आणि व्यवस्थित शेक करा.  यांनतर एका ग्लासमध्ये तुम्हाला हे तयार ड्रिंक बर्फासकट सर्व्ह करायचं आहे त्यात, गार्निशिंगसाठी ग्लासवर संत्र्याची साल डेकोरेट करू शकता , डेकोरेटिव्ह अम्ब्रेला आणि चेरी लावून गार्निश करू शकता.  (sex on the beach mocktail)