बोर्ड मिटींगमध्ये मुकेश अंबानींपर्यंत येऊन थेट ईशाचा प्रश्न, 'आधी मला हे उत्तर द्या...'

कसं आहे मुलांसोबत मुकेश अंबानी यांचं नातं ? 

Updated: Dec 23, 2021, 03:46 PM IST
बोर्ड मिटींगमध्ये मुकेश अंबानींपर्यंत येऊन थेट ईशाचा प्रश्न, 'आधी मला हे उत्तर द्या...' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अंबानी कुटुंबाकडे देशातील आणि जगातील श्रीमंत कुटुंब म्हणून पाहिलं जातं. किंबहुना त्यांच्या राहणीमानाचा, जीनवनशैलीचा सर्वांनाच कायम हेवा वाटतो. ही बाब नाकारता येत नाही. (Mukesh Ambani)

अंबानी कुटुंब आणखी एका कारणामुळे कायमच सर्वांची मनं जिंकून जातं. ते म्हणजे या कुटुंबात असणारे नात्यांचे बंध. 

रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी कायमच सर्वांपुढे काही आदर्श ठेवले आहेत.

एक उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी सातत्यानं त्यांची जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांनी एक वडील आणि एक पती म्हणूनही कायमच आपल्या कुटुंबालाही तितकंच प्राधान्य दिलं आहे. 

आकाश, अनंत आणि ईशा या तिन्ही मुलांनीही अंबानींना कायमच मोलाची साध दिली आहे. 

अतिशय सुरेख असं नातं यांच्यामध्ये पाहायला मिळतं. कामात कितीही व्यग्र असले तरीही मुकेश अंबानी यांनी कायमच मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या गरजांकडेही लक्ष दिलं आहे. 

एका कॉन्क्लेव्हमध्ये नीता अंबानी यांनी स्वत: मुकेश अंबानी आणि त्यांचं मुलांसमवेत असणारं नातं सर्वांसमोर आणलं होतं. 

कामाचा व्याप किती असो, जेवणाऱ्या वेळी कुटुंब एकत्रच असेल असा अलिखित नियम अंबानी कुटुंबात पाळला गेला. मुलांनाही त्यांनी याचीच सवय लावली. 

नीता यांनी एक किस्साही सांगितला, ज्यावेळी मुलगी ईशा हिनं वडिलांना त्यांच्या कामादरम्यानच गाठलं होतं. 

एकदा तिला एक गणित सोडवता येत नव्हतं. अशातच तिनं थेट फोन करत मुकेश अंबानींना गाठलं. 

अंबानी एका अतिशय महत्त्वाच्या मिटींगमध्ये होते. पण, त्यांनी ईशाच्या प्रश्नाचं उत्तरही प्राधान्यानं दिलं. 

Isha Ambani, Anand Piramal to have grand wedding

मुकेश अंबानी यांनी कधीच मुलांवर शिक्षणासाठी अपेक्षांचं ओझं लादलं नाही. पण, मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं जेणेकरुन त्यांना व्यवसाय आणि उद्योग क्षेत्राची माहिती असावी असंच वाटत होतं.

अंबानींच्या तिन्ही मुलांनी, त्यांच्या अपेक्षा नकळत पूर्ण केल्या. उच्चशिक्षण घेत या तिघांनीही उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती दिली. वडिलांना त्यांच्या कामात साथ दिली. 

वडील म्हणून एखाद्या व्यक्तीला मुलांना इतक्या उच्च स्थानी पाहण्याहून दुसरं सुख काय?