Heart Break मुळे हृदयविकाराचा धोका? किती धोकादायक जाणून घ्या

तुम्ही कोणाचं मन दुखावताय का? आताच काळजी घ्या! होऊ शकतं मोठं नुकसान

Updated: May 17, 2022, 03:40 PM IST
Heart Break मुळे हृदयविकाराचा धोका? किती धोकादायक जाणून घ्या title=

मुंबई : आपल्याला जोरात लागलं किंवा दुखलं खुपलं तर त्रास होतो. त्याला औषध देऊन बरं करावं लागतं. पण तसंच आपल्या शरीरात एक मन आहे. जे मन दिसत नाही पण त्यालाही लागतं, खुपतं आणि दुखावलं जातं. अनेकदा असं वाटतं की त्याला काही औषध नाही. त्यावर सॅड मोडची गाणी ऐकली जातात किंवा हे मन पुन्हा स्थिर करण्यासाठी धडपड सुरू होते. 

दुखावलेल्या मनालाही औषधांची कधीकधी गरज भासते. हे दुखावलेलं मन शरीरात आजार निर्माण करतं. त्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. त्याची तीव्रता किती आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. अमेरिकेत यावर एक खास अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आला. 

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याच लोकांची साथ आपल्याला मिळत नाही. काहीवेळा एखाद्या व्यक्तीसोबत आपलं चांगलं नातं तयार झालं की आपलं मन आपल्याला ते नातं तुटू नये आणि तुटलं तर काय होईल यासाठी आधीच मनाची तयारी करण्याचे संकेत देत असतं. ज्याला आपण कधीकधी इनसिक्युरिटी असं म्हणतो. 

जर मन दुखावलं तर त्याचा परिणाम सहाजिकच शरीरावर होतो. मेंदूवर ताण येतो तुमची इम्युनिटी सिस्टिम बिघडते. तुमची इम्युनिटी कमी झाली की शरीरवर त्याचा परिणाम होतो. हृदयावर आणि मेंदूवर ताण आला तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतत. कधी कधी ओव्हर स्ट्रेसमुळे हृदयविकाराचा धोकाही असतो असं या अहवालातून समोर आलं आहे. 

संवेदनशील गोष्टी कधीच लिहून सांगू नका. त्यामुळे त्या जास्त लक्षात राहतात आणि जास्त लागतात. ती गोष्ट बोलून सांगितली तर त्यामुळे त्रास कमी होतो. भेटून गोष्टी सांगण्यावर जास्त भर द्या, फोन किंवा मेसेजवर बोलून गोष्टी जास्त बिघडतात. 

रोज जेवढं आनंदी राहाल तेवढा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होणार आहे. म्हणून तर म्हणतात मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ. आता आपलं मन कसं दुखावलं जाणार नाही आणि दुखावलेलं मन पुन्हा कसं नीट होईल यावर काम करणं गरजेचं आहे. आपला ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा.