'वेड्या विकास'चा जन्मदाता झी २४ तासवर

गुजरात विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत असताना काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलचं रंगताना दिसत आहे.

Updated: Dec 4, 2017, 06:14 PM IST
'वेड्या विकास'चा जन्मदाता झी २४ तासवर title=

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत असताना काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलचं रंगताना दिसत आहे.

सोशल मीडियावर 'विकास वेडा झालाय' या शब्दांमध्ये काँग्रेसकडून मोदींच्या 'गुजरात मॉडेल'वर प्रश्न उपस्थित करत टीका करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं विकासाचा नारा लगावला खरा, मात्र हा नारा भाजपसाठीच नंतर अडचणीचा ठरला. 

कारण, विकास वेडा झाल्याच्या हॅशटॅगन गुजरात पाठोपाठ देशात धुमाकूळ घातला. याच वेडा झालेल्या विकासाच्या जन्मदात्याशी आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी साधलेला संवाद...

विकासाला नेमके काय झालयं? विकास वेडा कसा झालायं? हे सांगितलयं स्वत: विकासाच्या जन्मदात्यानेच.