स्टॅच्यू ऑफ युनिटी ठरलं देशातील सर्वाधिक कमाई करणारं स्मारक

स्टॅच्यू ऑफ युनिटीने ताजमहलला टाकलं मागे.

Updated: Nov 5, 2019, 03:15 PM IST
स्टॅच्यू ऑफ युनिटी ठरलं देशातील सर्वाधिक कमाई करणारं स्मारक title=

नवी दिल्ली : गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिट हे देशातील सर्वाधिक कमाई करणारं स्मारक ठरलं आहे. एका वर्षात २४ लाख पर्यटकांनी या स्मारकाला भेट दिली असून ६३ कोटी रुपयांची कमाई या स्मारकाने केली आहे. ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झाली आहे. मात्र कमाई केवळ ५६ कोटी रुपये असून कमाई करणाऱ्या स्मारक पर्यटन स्थळांमध्ये ताजमहाल दुसऱ्या स्थानी आहे. 

दरम्यान सर्वाधिक पर्यटक हे ताजमहालला भेट देत असले तरी कमाई मात्र स्ट्रच्यू ऑफ युनिट स्मारकाची होत आहे. जगातील सर्वाधिक उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर २०१८ मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचं उद्घाटन झालं होतं. 

भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याने कमाईच्या बाबतीत देशातील श्रेष्ठ ५ स्मारकांमध्ये बाजी मारली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हा पुतळा बनवण्यासाठी २९८९ रुपये खर्च करण्यात आले होते. लार्सन अँड टुब्रो कंपनीने हा पुतळा बनवला होता. सरदार सरोवर धरणापासून ३.२ किलोमीटरवर साधू बेटावर हा पुतळा बनवण्य़ात आला आहे. हा पुतळा बनवण्यासाठी ३ हजार हून अधिक मजूर आणि २५० हून अधिक इंजिनियर्स झटत होते.

स्टॅच्यू ऑफ युनिटीनंतर ताजमहल, आग्र्याचा किल्ला, कुतुब मिनार, फतेहपूर सीकरी आणि दिल्लीचा लाल किल्ला यांचा नंबर लागतो. मागच्या वर्षी ताजमहलने ५६.८३ कोटींची कमाई केली होती.