SBI मधून ऑनलाईन ट्रांझॅक्सन करण्याआधी ही बातमी नक्की वाचा

  जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) खातेदार असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Updated: Jul 29, 2021, 03:10 PM IST
SBI मधून ऑनलाईन ट्रांझॅक्सन करण्याआधी ही बातमी नक्की वाचा title=

मुंबई :  जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) खातेदार असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने आपल्या बँकिंग अ‍ॅप्लीकेशन YONOशी संबंधित नियम बदलले आहेत. या बदलानंतर एसबीआयची ऑनलाइन बँकिंग पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे. हे बदल काय आहेत आणि त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्याला काय करावे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

एसबीआयचे ट्विट

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सुरक्षे संदर्भात (एसबीआय) एक ट्विट केले आहे, ज्यात असे लिहिले आहे की, आता एसबीआयबरोबर ऑनलाईन बँकिंग पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे. यासाठी नवीनतम YONO लाइट अ‍ॅप डाउनलोड करा. त्याचबरोबर एसबीआयने सांगितले आहे की, त्याने नवीन फिचर सिम बाइंडिंग सुरू केले आहे.

हे सिम बाइंडिंग वैशिष्ट्य काय?

हे एक नवीन तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे नोंदणीकृत मोबाईलमध्ये ते ही केवळ एका डिव्हाइसवर लॉग-इन करणे शक्य आहे. यावर आपण इतर कोणत्याही पर्यायी क्रमांकासह लॉग इन करू शकणार नाही. म्हणजेच, आपण ज्या मोबाईमध्ये तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचा सिम असेल त्याच फोनवरून तुम्ही बँकिंग अ‍ॅप लॉगिन करण्यास सक्षम असाल.

ज्यामुळे तुम्ही इतर कोणत्याही फोनवरून आपल्या अॅपवर लॉग इन करण्यास सक्षम राहणार नाही. जर एसबीआय ग्राहकांनी इतर कोणत्याही क्रमांकावरून लॉगइन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना व्यवहार करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

YONO Appला  अपडेट करणे आवश्यक आहे

या नवीन फीचरमुळे ऑनलाइन बँकिंगची सुविधा पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे. ते वापरण्यासाठी, ग्राहकांना त्यांचा YONO App अपडेट करावा लागेल.

बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरील पोस्टद्वारे नवीन नियमांची माहिती दिली आहे. ज्यामध्ये एसबीआयने सांगितले की ग्राहक YONO Lite App देखील डाउनलोड करू शकतात. या अ‍ॅपमध्ये हे सुरक्षा वैशिष्ट्य जोडले गेले आहे.

SBI YONO Lite App वर अशी करा नोंदणी

-आपण Android वापरकर्ते असल्यास प्ले स्टोअर वरून SBI YONO Lite App डाउनलोड करा.

-तुमचा रजिस्टर मोबाईलनंबर ज्या सिम स्लॉटमध्ये आहे तो निवडा जसे की, (सिम -1 सिम -2)

-जर एकच सिम असेल तर तो सिम निवडावा लागेल.

-स्क्रीनवर एक संदेश दिसेल. Proceed क्लिक केल्यावर एसएमएसद्वारे कोड पाठवला जाईल.

-रजिस्ट्रेशन स्क्रीन वर आपले नाव आणि पासवर्ड टाकल्यानंतर, REGISTER वर क्लिक करा.

-अटी आणि शर्ती मान्य केल्यावर ओके बटणावर क्लिक करा.

-यानंतर आपल्याला एक एक्टिवेशन कोड मिळेल. हा एक्टिवेशन कोड केवळ 30 मिनिटांसाठीच सक्रिय असेल.

-अ‍ॅपमध्ये हा कोड लिहिल्यानंतर, सक्रिय करण्याची प्रक्रिया पूर्ण करा. वापरकर्ते आता YONO Lite App वापरण्यास सक्षम असतील.