SBI चं खातं असो किंवा नसो, आता तुम्हाला घेता येणार बँकेच्या 'या' महत्त्वाच्या सुविधेचा लाभ

SBI YONO App UPI Service : गेल्या काही काळात बँकिंग क्षेत्रात बरीच प्रगती झाली. बहुतांश बँकांनी त्यांच्या डिजिटल कार्यप्रणालीवर भर दिला. एसबीआयही त्यातलीच एक... 

सायली पाटील | Updated: Jul 18, 2023, 10:51 AM IST
 SBI चं खातं असो किंवा नसो, आता तुम्हाला घेता येणार बँकेच्या 'या' महत्त्वाच्या सुविधेचा लाभ title=
sbi yono App upi Service For All will make payment and transaction process eaiser know details

SBI YONO App UPI Service : देशातील एक नावाजलेली बँक असणाऱ्या एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँकेकडून नुकतंच त्यांच्या ऑनलाईन बँकिंग सुविधेशी संबंधित Yono App चं नवं व्हर्जन सेवेत आणलं गेलं. वेळोवेळी खातेधारकांच्या फायद्याच्याच विचार करत काही नवनवीन गोष्टी आणि सुविधांची सुरुवात करणाऱ्या एसबीआयनं आता सर्वच खातेधारकांना आनंदाची बातमी दिली आहे. कारण, आता युनायटेड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआयनं तुम्हीही योनो अॅप वापरून पैशांची देवाणघेवाण करू शकता. बँकेकडूनयच यासाठीची अधिकृत परवानगी देण्यात आली. आहे. थोडक्यात आणि सोप्या शब्दांत सांगावं तर, आता योनो अॅपवरील सुविधांचा फायदा घेम्यासाठी तुमच्याकडे एसबीयाचच खातं असणं बंधनकारक नसेल. 

अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून माहिती देताना एसबीआयकडून या घोषणेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. जिथं हे अॅप वापरणाऱ्या युजर्सना पैशांची देवाणघेवाण करता येणारप आहे. इथं त्यांना संपर्क यादीत असणाऱ्यांनाही पैसे पाठवण्याची मुभा असेल. आता राहिला प्रश्न जे खातेधारक नाहीत त्यांनी हे अॅप वापरण्यासंबंधीचा तर ती प्रक्रिया खालीलप्रमाणं... 

- Google Play Store, App Store वर उपलब्ध असणारं Yono App डाऊनलोड करा. 
- अॅप डाऊनलोड झाल्यानंतर ते Open करा. 
- आता समोर दिसणाऱ्या New To SBI या पर्यायावर क्लिक करा. 
- अॅप वापरण्यासाठी तुम्ही Register Now हा पर्याय निवडा. 
- लक्षात घ्या, तुम्ही एसबीआयचे खातेधारक नसाल तरच तुम्हाला या पर्यायावर क्लिक करायचं आहे. 
- नोंदणी झाल्यानंतर पुढील टप्प्यावर तुम्हाला Register to Make UPI Payments हा पर्याय निवडावा लागेल. जिथं तुमचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. 
- आता ज्या क्रमांकाशी बँक खातं लिंक आहे, ते निवडा. 

हेसुद्धा वाचा : भगवद् गीता अन् अणुबॉम्ब...1200 रुपये तिकीट; 'आता मी मृत्यू आहे' म्हणणारे Oppenheimer आहेत तरी कोण?

- मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी आता तुम्हाला एक मेसेजड येईल. ज्यानंतर तुम्बी सोमय्यांचा कथित व्हिडीओ विधानसभा गाजवणार?  UPI ID तयार करण्यासाठी बँकेची निवड करू शकता. 
- आता तुम्हाला your registration for SBI Pay has started. If it’s not you, please report it to your bank immediately असा एक मेसेज येईल.  
- ज्यानंतर तुम्ही SBI UPI बनवणं अपेक्षित असेल. जिथं तुम्हाला एसबीआय तीन पर्याय देईल ज्यामधून तुम्ही एकाची निवड करणं अपेक्षित असेल. 
- UPI आयडी निवडल्यानंतर 'You have successfully created an SBI UPI handle' असा एक मेसेज तुम्हाला मिळेल. 
- पुढे 6 अंकी MPIN जनरेट करा आणि इथपासून तुम्ही योने अॅप वापरू शकता.