मासिक पाळी रजेसंदर्भात विधानसभेत गदारोळ; BJP च्या विचारसरणीवर प्रश्न

विधानसभेत मासिक पाळीच्या सुट्टीच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला.

Updated: Mar 17, 2022, 10:10 AM IST
मासिक पाळी रजेसंदर्भात विधानसभेत गदारोळ; BJP च्या विचारसरणीवर प्रश्न title=

अरूणाचल : अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत मासिक पाळीच्या सुट्टीच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षाच्या अनेक सदस्यांनी महिलांना मासिक पाळीच्या रजेच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्यास नकार दिला. यावर राष्ट्रीय जनता दलाने भाजपवर हल्लाबोल करत भाजप आमदारांनी ठरवलं तर महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये विधानसभेत येण्यासही नकार देतील.

पिरीयड्स सुट्टीबाबत चर्चा अशुभ मानते भाजप

RJD Spokesperson रितु जायस्वाल यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, लालू प्रसाद यादव यांनी मासिक पाळी दरम्यान महिलांना होणारा त्रास पाहता बिहारमध्ये मासिक पाळीच्या सुट्टीला मंजूरी देण्यात आली होती. लालू यांची एक अशी विचारसरणी होती आणि भाजपच्या विचारसरणीनुसार, विधानसभेत याबाबत चर्चा अशुभ मानली जाते.

काय आहे पूर्ण प्रकरण?

अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी कामकाजी महिलांसाठी मासिक पाळीच्या दिवसात रजेची मागणी करणारं खाजगी सदस्य विधेयक सभागृहात चर्चेसाठी ठेवलं होतं. 

नोकरदार महिला आणि मुलींना मासिक पाळी सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी सुट्टी देण्यात यावी, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. निनांग एरिंग यांनी जपान आणि इटली व्यतिरिक्त बिहार आणि केरळ या राज्यांचा हवाला देत सांगितलं की, मासिक पाळीच्या दिवसांत सुट्टी देण्याची तरतूद आहे.

निनांग म्हणाले की, मासिक पाळीच्या दिवसात रजेच्या तरतुदीमुळे महिला आणि मुलींना अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यास मदत होईल.