TATA वर विश्वास दाखवल्याचा फायदा! वर्षभरात गुंतवणूकदारांना दुप्पट करुन दिले 'या' शेअर्समधील पैसे

Share Market : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांसाठीच टाटा समुहाचे शेअर्स म्हणजे सर्वप्रथम पसंती. अशा या गुंतवणुकीनं आता अनेकांना फायदा झाला आहे.   

सायली पाटील | Updated: Dec 26, 2023, 01:05 PM IST
TATA वर विश्वास दाखवल्याचा फायदा! वर्षभरात गुंतवणूकदारांना दुप्पट करुन दिले 'या' शेअर्समधील पैसे title=
share market tata Multibagger Share Stock return investors money double

Multibagger Stock : 'शेअर मार्केट इज सब्जेक्ट टु मार्केट रिस्क...' या अशा ओळी तुम्ही शेअर बाजाराशी संबंधित अनेक जाहिराती किंवा तत्सम गोष्टींदरम्यान पाहिल्या असतील. शेअर बाजारात गुंतवणूक करायची म्हटलं की अनेकदा काही गोष्टींची काळजी घे हं, असंच अनेकजण म्हणतात किंवा सतर्क करतात. या आगळ्यावेगळ्या आणि काही प्रमाणात Risk असणाऱ्या दुनियेत विश्वासार्हता जपणारीही काही नावं आहेत. यामध्ये आघाडीवर येणारं एक नाव आहे, टाटा उद्योग समुहाचं. 

शेअर बाजार जगतामध्ये सध्या टाटा समुहाचाच एक भाग असणाऱ्या एका कंपनीची बरीच चर्चा होताना दिसत आहे. कारण, या कंपनीकडून गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स (Multibagger Return) च्या स्वरुपात घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. टाटा समुहाचाच एक भाग असणारी ही कंपनी आहे, ट्रेंट लिमिटेड (Trent Ltd Share). 

पाच लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या कंपनीकडून वर्षभराच्याच कालावधीत 10 लाखांहून अधिक परतावा देण्यात आला आहे. गेल्या दशकभराचा आढावा घेतला असता या शेअरनं गुंतवणूकदारांना फायदाच दिला असून, Negetive Returns दिलेले नाहीत. 

कंपनीचं कोणत्या क्षेत्रात योगदान? 

Tata Group ची ट्रेंट लिमिटेड रिटेल ही कंपनी ब्यूटी, फॅशन प्रोडक्ट या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या कंपनीच्या मुख्य ब्रँड्समध्ये झुडिओ, वेस्टसाईडचा समावेश आहे. देशभरात 500 हून अधिक दुकानं असणाऱ्या या कंपनीचा समावेश 1 लाख रुपयांच्या मार्केट कॅप यादीत केला जातो. टाटा समुहाकडून या कंपनीची सुरुवात 1998 मध्ये करण्यात आली होती. 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 13 डिसेंबर 2013 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 101 रुपये होती. 2023 च्या डिसेंबरमध्ये त्याचीच किंमत 29680 रुपयांवर पोहोचली. म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये या शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं. सरासरी 72.25 टक्के नफा देणाऱ्या या शेअरमध्ये तुम्हीही गुंतवणूक केलिये का? 

हेसुद्धा वाचा : इतिहासात नोंद असलेल्या 'या' नैसर्गिक आपत्तींना जग आजही विसरलेलं नाही; विचारानंही मन सुन्न होतंय 

गेल्या 10 वर्षांमध्ये या कंपनीकडून गुंतवणूकदारांना टाटाच्या या कंपनीकडून 118.64 टक्के इतका परतावा मिळाला. हा मल्टीबॅगर परतावा देणारा शेअर 2022 च्या डिसेंबर महिन्यात 1357 रुपयांच्या किमतीवर होता. वर्षभरातच ही रक्कम दुपटीनं वाढली आणि गुंतवणूकदारांच्या खात्यात घसघशीत नफा आला. काय मग, तुम्ही गुंतवणुकीचा विचार करताय की नाही?