सियाचिनमध्ये बर्फाच्या वादळात ४ जवान शहीद

 सियाचिन ग्लेशियरमध्ये आलेल्या बर्फाच्या वादळात ४ भारतीय जवान शहीद झाले आहेत. 

Updated: Nov 19, 2019, 08:21 AM IST
सियाचिनमध्ये बर्फाच्या वादळात ४ जवान शहीद  title=

सियाचिन : जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचिन ग्लेशियरमध्ये आलेल्या बर्फाच्या वादळात ४ भारतीय जवान शहीद झाले आहेत. तसेच २ पोर्टरचा (जवानांचे सामान सामान उचलणारे) देखील यात मृत्यू झाला. हे जवान पेट्रोलिंग टीमचा भाग होते. एवलॉन्चमध्ये अडकलेल्या जवानांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु झाले पण केवळ ४ जवानांना वाचवण्यात यश आले. लेह पोलिसांची टीम देखील मदतीसाठी घटनास्थळी उपस्थित आहे. हे एवलॉन्च हे दुपारी ३ वाजता आले. उत्तर ग्लेशियरमध्ये आलेल्या एवलॉन्चची उंची १८ हजार फूट हून अधिक आहे.

हवामान मोठा शत्रू 

सियाचिनमध्ये बदलणारे हवामान हाच भारतीय जवानांसाठी मोठा शत्रू आहे.

सियाचिन ही जगातील सर्वात ऊंच युद्धभूमी आहे. सियाचा अर्थ गुलाब आणि चिनचा अर्थ जागा असा होता.

यानुसार हा गुलाबांचा पहाड असला तरी भारतीय जवानांना याच्या काट्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

सियाचिनमध्ये तापमान मायनस ५० डीग्री सेल्सियस पर्यंत पोहोचते. 

१९८४ पासून आतापर्यंत सियाचिनमध्ये ९०० जवान शहीद झाले आहेत. 

यातील अधिकतर हिमसख्खलन आणि वातावरणामुळे शहीद झाले. 

ऊंचावर काम करण्यामुळे होणारे आजार आणि पेट्रोलिंग दरम्यान जास्त थंड असल्याने हृद्यावर परिणाम झाल्याने जवान शहीद झाले आहेत. 

खूप मोठा काळ शून्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास हृदयावर ओझ येतं आणि त्यासंबंधी आजार वाढण्याचे प्रमाण वाढते. 

काही जवानांना एक्यूट माऊंटेन सिकनेस असतो.

अशावेळी त्यांना पहाड चढताना कधीकधी डोकं दुखत आणि चक्कर येते.

अशावेळी ऊंच ठिकाणी जर तापमान ही खूप कमी असेल आणि डोक्यावर दबाव वाढतो. खूप थंडी पडल्यास रक्त गोठू शकते.

बोट गळून पडतात. निमोनियाचे इन्फेक्शन होते आणि शरीराचा भाग सडू देखील शकतो.