याला म्हणतात चिंधीचोरी! 40 लाखांच्या आलिशान कारमधून रस्त्यावरील कुंड्या चोरल्या... Video व्हायरल

Delhi Pot Stealing Case : सोशल मीडियावर दिल्लीतलं एक प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. G20 कार्यक्रमासाठी आणण्यात आलेल्या फुलांच्या कुंड्या चोरण्यात आल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Updated: Mar 1, 2023, 05:14 PM IST
याला म्हणतात चिंधीचोरी! 40 लाखांच्या आलिशान कारमधून रस्त्यावरील कुंड्या चोरल्या... Video व्हायरल title=

Delhi Pot Stealing Case : दिल्लीतलं (Delhi) एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलंच व्हायरल झाला आहे. दिल्लीत G-20 सम्मेलन होणार आहे, यासाठी सुशोभीकरण सुरु असून रस्त्यांच्या दुतर्फा फुलांच्या कुंड्या ठेवल्या जात आहे. या कुंड्या चोरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे चोरटे श्रीमंत घरातले असून चाळीस लाखांच्या कारमधून त्यांनी ही चोरी केली. याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police) कारवाई करत एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव मनमोहन असं आहे. मनमोहचनचा साथीदार नवाब सिंह हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Gurugram Flower Pot Stealing Case)

कोण आहे मनमोहन?
मनमोहन हा गुरुग्राममधल्या गांधी नगर परिसरात राहाणारा असून व्यवसायाने तो प्रॉपर्टी डिलर आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील कारच्या नंबर प्लेटमुळे पोलिसांनी आरोपी मनमोहनला अटक केली. ज्या अलिशान कारमधून कुंड्या चोरण्यात आल्या होत्या, ती कार मनमोहनच्या पत्नीच्या नावावर आहे. या प्रकरणातील दुसरा फरार आरोप नवाब सिंह गुरुग्रामधल्या अॅथॉरिटी GMD पदावर कार्यरत आहे. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनमोहन आणि नवाब  सिंह हे आपल्या KIA CARNIVAL या कारमधून दिल्लीहून गुरुग्राममध्ये येत होते. कारची किंमत जवळपास 40 लाख रुपये इतकी आहे. कार गुरुग्राममध्ये आली असता त्यांना रस्त्याच्या एका बाजूला सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या दिसल्या. या कुंड्या चोरण्याचा मोह त्यांना झाला. त्यांनी रस्त्याच्या कडेला कार थांबवली आणि काही कुंड्या कारमध्ये टाकल्य आणि तिथून फरार झाले. पण त्यांची हे कारमाने एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले, याचा त्यांना पताच नव्हता.
 
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि बघता बघता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. 

युट्यूबरवर झाला होता आरोप
सोशल मीडियावर चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव चोर असल्याचं लोकांना वाटलं. या व्हिडिओवर लोकांनी एल्विश यादव जबरदस्त ट्रोल केलं. काही लोकांनी या व्हिडिओबरोबर एल्विश यादवचा फोटो शेअर केला. तसंच ती कार एल्विश यादवची असल्याचा दावाही करण्यात आला. त्यामुळे लोकांनी एल्विश यादववर जोरदार टीका केली. पण पोलीस तपासात चोरटे दुसरेच असल्याचं समोर आलं.