लहान लेकरांचा Funny व्हिडिओ पाहून मोदी देखील हसले असतील; कोरोनासाठी शिक्षणाचं बलिदान देण्यास तयार

काही विद्यार्थी कोरोना काळातील सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. अशाच दोघं विद्यार्थ्यांचा विनोदी व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Jul 3, 2021, 04:42 PM IST
लहान लेकरांचा Funny व्हिडिओ पाहून मोदी देखील हसले असतील; कोरोनासाठी शिक्षणाचं बलिदान देण्यास तयार title=

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळा बंद आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे. परंतु काही विद्यार्थी कोरोना काळातील सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. अशाच दोघं विद्यार्थ्यांचा विनोदी व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. 

या  व्हिडिओमध्ये एक मुलगा म्हणतो की, कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी आम्हाला अभ्यासाचं बलिदान द्यावं लागलं तरी आम्ही तयार आहोत.  
तसंच दुसरा मुलगा म्हणतो की, जर ७ वर्षपण शाळा बंद राहिल्या तर हे बलिदान आम्ही द्यायाला तयार आहोत.

हा व्हिडिओ कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही. लहान मुलांचा स्वज्वळ चेहरा आणि बोलनं पाहून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हसू आलं असेल, अशा प्रतिक्रीया सोशलमीडियावर उमटत आहेत.