चेंजिग रुममध्ये कपडे बदलत होती महिला डॉक्टर... वर पाहते तर काय...

धक्कादायक प्रकार आला समोर...

Updated: Oct 30, 2018, 02:05 PM IST
चेंजिग रुममध्ये कपडे बदलत होती महिला डॉक्टर... वर पाहते तर काय... title=

नवी दिल्ली : नेहमी वादात असलेलं अलीगढ मुस्लीम विद्यापीठ पुन्हा एकदा एका वादात अडकलं आहे. एका महिला डॉक्‍टरने गंभीर आरोप केले आहेत की चेंजिग रूममध्ये कपडे बदलत असताना कोणीतरी मोबाईलवर तिचा व्हिडिओ काढत होता. या प्रकरणी महिला डॉक्टरांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. 

ऑपरेशन थियेटरजवळ महिला डॉक्टर्ससाठी चेंजिग रुम बनवण्यात आला आहे. हा चेंजिग रुम चारही बाजुने बंद असला तरी वरच्या बाजुने तो उघडा आहे. या चेंजिग रुमकडून एक रस्ता कँटीनकडे, दुसरा रस्ता सिक्योरिटी ऑफिसकडे जातो. 11 ऑक्टोबरला दुपारी एक महिला डॉक्टर कपडे बदलत असताना तिचं लक्ष अचानक वर गेलं तेव्हा तिला एक मोबाईल आणि एका व्यक्तीचा हात दिसला. महिला यानंतर लगेचच ओरडली. तिचा आवाज ऐकून इतर लोकं देखील तेथे जमा झाले. पण तो तेथून फरार झाला.

महिला डॉक्टरांनी या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. याआधी देखील असे प्रकार झाले असतील. त्यामुळे लवकरात लवकर आरोपीला पकडण्याची मागणी करण्यात आली आहे.