Sovereign Gold Bond Scheme: आज स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी; जाणून घ्या स्कीम

Sovereign Gold Bond Scheme 2021-22 सोने खरेदीचा विचार तुम्ही करीत असाल तर, आज तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 

Updated: May 17, 2021, 09:56 AM IST
Sovereign Gold Bond Scheme: आज स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी; जाणून घ्या स्कीम title=
representative image

नवी दिल्ली : Sovereign Gold Bond Scheme 2021-22 सोने खरेदीचा विचार तुम्ही करीत असाल तर, आज तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सरकार आर्थिक वर्ष 2021 -22 साठी Sovereign Gold Bond Scheme ची पहिली विक्री आज म्हणजेच 17 मे पासून सुरू करणार आहे. ही योजना पुढील 5 दिवस चालेल. हा बॉंड भारत सरकाच्या वतीने RBI जारी करते. 

Sovereign Gold Bond Scheme सुरू

केंद्र सरकार मे 2021 ते सप्टेंबर 2021 च्या दरम्यान, Sovereign Gold Bond Scheme 2021-22 अंतर्गत गोल्ड बॉंड्स 6 हफ्त्यांमध्ये जारी करणार आहे. त्याचा पहिला ट्रांच सबस्क्रिप्शनसाठी आज खुला होणार आहे. 

आज खुल्या होणाऱ्या गोल्ड बॉंडची इश्यू प्राईज 47700 रुपये प्रति तोळे असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि पैसे भरल्यास 50 रुपये प्रति ग्रॅम डिस्काउंटसुद्धा मिळेल.

Sovereign Gold Bond Scheme चा म्यॅच्युरिटी पीरियड 8 वर्षाचा आहे.  17 ते 21 मे दरम्यान पहिल्या सिरिजची विक्री आज करता येणार आहे. यासाठी 25 मे ला बॉंन्ड जारी करण्यात येणार आहे.

दुसरी सिरिज 24 ते 28 मे दरम्यान सुरू होणार आहे. दुसऱ्या सिरीजचे गोल्ड बॉंड 1 जून रोजी इश्यू करण्यात येणार आहे. 

31 मे ते 4 जून दरम्यान तिसरी सिरीज सुरू होईल. तर या सिरिजचे गोल्ड बॉंड 8 जून रोजी इश्यू होणार आहे.