Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील हा शेअर, आणखी देणार जबरदस्त नफा? एका वर्षात दुप्पट झाला पैसा

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेला डेल्टा कॉर्पच्या शेअरला एक्सिस सेक्युरिटीजने आपल्या 'विकली टेक पिक'मध्ये सामिल केले आहे

Updated: Nov 9, 2021, 01:09 PM IST
Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील हा शेअर, आणखी देणार जबरदस्त नफा? एका वर्षात दुप्पट झाला पैसा title=

मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला (Rakesh Jhunjhunwala)यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेला डेल्टा कॉर्पच्या शेअरला एक्सिस सेक्युरिटीजने आपल्या 'विकली टेक पिक'मध्ये सामिल केले आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, करंट प्राइजने गुंतवणूक केल्यास 3-4 आठवड्यात 12 ते 18 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.

Delta Corp : एका वर्षात 150 टक्क्यांचा रिटर्न
डेल्टा कॉर्पच्या शेअरने मागील एका वर्षात गुंतवणूक करणाऱ्यांना 150 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. या वर्षी आतापर्यंत 78.68 टक्क्यांचा रिटर्न या शेअरने दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने टेक्निकल चार्टच्या आधारावर डेल्टा कॉर्पमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

310 ते 328 चे टार्गेट
ब्रोकरेज फर्म एक्सिस सेक्युरिटीजने डेल्टा कॉर्पमध्ये 280-275 रुपयांच्या रेंजमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला. यामध्ये स्टॉपलॉस 256 रुपये ठेवण्यात आला आहे. ब्रोकरेज हाऊसने या शेअरसाठी 310 ते 328 रुपयांचे टार्गेट दिले आहे. 

राकेश झुनझूनवाला यांची Delta Corp मध्ये 7.5 टक्के होल्डिंग
डेल्टा कॉर्प लिमिटेडमध्ये राकेश झुनझूनवाला यांची होल्डिंग 7.5 टक्के आहे. त्यांची पत्नी रेखा यांचीदेखील या कंपनीत गुंतवणूक आहे. झुनझूनवाला यांना भारतातील वॉरेन बफेट म्हटले जाते. त्यांच्या पोर्टफोलिओला भारतातील अनेक लहान मोठे गुंतवणूकदार फॉलो करीत असतात.