Buy Call : 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर मिळवून देणार पैसाच पैसा; दिग्गज गुंतवणूकदारांची मोठी खेळी

शेअर बाजाराने मागील एका वर्षात चांगला रिटर्न दिला आहे. बाजारातील तेजीमध्ये गुंतवणूकीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Updated: Oct 29, 2021, 02:18 PM IST
Buy Call : 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर मिळवून देणार पैसाच पैसा; दिग्गज गुंतवणूकदारांची मोठी खेळी title=

मुंबई : शेअर बाजाराने मागील एका वर्षात चांगला रिटर्न दिला आहे. बाजारातील तेजीमध्ये गुंतवणूकीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. असे अनेक शेअर आहेत. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक दुप्पट तिप्पट करू शकता. असे दोन शेअर पूनावाला फिनकॉर्प(Poonawalla Fincorp ) आणि प्रिज्म जॉनसन(Prism Johnson )होय. पूनावाला फिनकॉर्पने मागील एका वर्षात 343 टक्के रिटर्न दिला आहे. प्रिज्म जॉनसनचा शेअर 70 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities)ने या दोन्ही शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पूनावला फिनकॉर्पच्या शेअर्सवर 265 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे  तर, प्रिज्म जॉनसनच्या शेअरची खरेदी करण्याचा सल्ला देत 152 रुपयांचा टार्गेट देण्यात आले आहे. 

Poonawalla Fincorp: 60 टक्क्यांच्या रिटर्नचा अंदाज 
ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सेक्युरिटीजने पूनावाला फिनकॉर्पसाठी 265  रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. सध्याचा भाव 163 रुपयांच्या आसपास आहे. 
या स्तरावर खरेदी केल्यास गुंतवणूकदार 60 टक्क्यांपर्यंतचा रिटर्न मिळवू शकतात. 

ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, कंपनी बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनमधून जात आहे. लीडरशिप टीम मजबूत होत आहे. क्रेडिट पॉलिसीमध्ये बदल होत आहे. याशिवाय कंपनीचे रिस्क मॅनेजमेंट डेटा ऍनालिटिक्स आणि डिजिटल क्षमता वाढवत आहे.

Prism Johnson:26 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळवण्याची शक्यता
आयसीआयसीआय सेक्युरिटीज प्रिज्म जॉन्सनसाठी 152 रुपयांच्या टार्गेटसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 29 ऑक्टोबर रोजी शेअरचा भाव 120 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे टार्गेटनुसार गुंतवणूकदारांना 26 टक्क्यांचा रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.
ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, इंडस्ट्रीचा रिस्क रिवॉर्ड कंपनीसाठी फेवरेबल आहे. त्यामुळे या शेअरसाठी बाय कॉल दिला आहे