आता रामदेव बाबाही मुस्लिम महिलांच्या पाठिशी

असदुद्दीन ओवेसीसकट बऱ्याचशा मुस्लिम नेत्यांनी ट्रिपल तलाकच्या कायद्याला विरोध केला आहे.    

Updated: Dec 3, 2017, 05:37 PM IST
आता रामदेव बाबाही मुस्लिम महिलांच्या पाठिशी title=

लखनौ : असदुद्दीन ओवेसीसकट बऱ्याचशा मुस्लिम नेत्यांनी ट्रिपल तलाकच्या कायद्याला विरोध केला आहे.    

ट्रिपल तलाक हवाच

ट्रिपल तलाकच्या कायद्याला पाठिंबा देतांना रामदेव बाबांनी, इस्लामच्या नावावर स्रियांवर होणारे अत्याचार बंद झाले पाहिजेत असं म्हटलंय.
केंद्र सरकार आणत असलेल्या बिलाला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. या बिलामुळे मुस्लिम स्रियांचा आदर राखला जाणार असून, त्याचं हितचं राखलं जाणार आहे, असं रामदेव बाबा म्हणाले.

असदुद्दीन ओवेसी विरोधात

अनेक मुस्लिम नेत्यांनी ट्रिपल तलाकच्या कायद्याला विरोध केला आहे. यातून सरकार इस्लामच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केलाय. एमआयएमचे असदुद्दीन ओवेसीसुद्धा असा कायदा आणण्याचा विरोधात आहेत.

उत्तर प्रदेशात रोजगारनिर्मिती

रामदेव बाबांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यावेळेस त्यांनी आपलं मत मांडलं. पतंजली उत्तर प्रदेशात अनेक क्षेत्रात काम करणार असून रोजगारनिर्मितीसुद्धा करणार आहे. पतंजली लवकरच नॉयडा आणि बुंदेलखंड इथं फॅक्टरी सुरू करतयं.