करुणानिधींच्या निधनानंतर डीएमकेमध्ये 'महाभारत'

करुणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये वाद

Updated: Aug 13, 2018, 05:08 PM IST
करुणानिधींच्या निधनानंतर डीएमकेमध्ये 'महाभारत' title=

चेन्नई : डीएमके चीफ एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात भावा-भावांमध्ये उत्तराधिकारी कोण यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. सोमवारी करुणानिधी यांच्या समाधी स्थळी जाऊन त्यांचा मोठा मुलगा एम. के. अलागिरी यांनी दावा केला आहे की, संपूर्ण डीएमके कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहे.

उत्तराधिकारी कोण ?

करुणानिधी यांचा उत्तराधिकारी कोण यावरुन स्टालिन आणि अलागिरी यांच्यात वाद सुरु झाला आहे. दोघांमधील नातं खराब झालं आहे. करुणानिधींचा उत्तराधिकारी म्हणून दोन्ही मुलं दावा करत आहेत.

अलागिरी यांनी म्हटलं की, 'माझ्या वडिलांचे खरे नातेवाईक त्यांच्या बाजुने आहे. तमिळनाडूमध्ये पक्षाचे सर्व कार्यकर्ते माझ्या बाजुने आहे. मी पक्षाची जबाबदारी हातात घ्यावी म्हणून माझा उत्साह वाढवत आहेत. मी आता इतकच सांगतो की, येणारी वेळच सर्वच प्रश्नांची उत्तर देईल.'

2014 मध्ये पक्षातून हक्कालपट्टी 

2014 मध्ये अलागिरी यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून ते राजकारणातून दूर होते. एका वर्षापूर्वीच त्यांचा छोटा भाऊ आणि करुणानिधी यांचा लहान मुलगा स्टालिन यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती.

वारसदाराचा वाद

आता करुणानिधींच्या निधनानंतर एका आठवड्यातच अलागिरी यांनी पक्षावर आपला दावा जाहीर केला आहे. त्यांनी स्वत:ला करुणानिधी यांचा राजकीय वारस म्हणून स्वत:ला पुढे केलं आहे. स्टालिन यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्याच्या निर्णयावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

डीएमकेची बैठक

आता असं म्हटलं जात आहे की, पुढच्या काही महिन्यात हा संघर्ष आणखी वाढणार आहे. मंगळवारी डीएमकेची महत्त्वाची बैठक होणार आहे. पण त्याआधी दोन भावांचा वाद आणि दावे सुरु झाले आहेत. त्यामुळे बैठकीत देखील गोंधळ होण्याची शक्यता आहे.