अलविदा... सुषमा स्वराज अनंतात विलीन

अनेक राजकीय नेत्यांनी वाहिली आदरांजली 

Updated: Aug 7, 2019, 04:57 PM IST
अलविदा... सुषमा स्वराज अनंतात विलीन title=

मुंबई : मोदी सरकारच्या पहिल्या कार्य़काळात केंद्रात परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या आणि राजकीय पटलावर अत्यंत प्रभावी अशी कामगिरी करणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचं निधन झालं आणि सारा देश शोकसागरात बुडाला. 

अखेरच्या श्वासापर्यंत देशहिताचाच विचार करणाऱ्या सुषमा स्वराज यांनी अनुच्छेद ३७० रद्द झाल्याप्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून आनंदही व्यक्त केला होता. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राच एक पोकळी निर्माण झाली आहे हे खरं असतं तरीही प्रकाशमान अशी त्यांची कारकिर्द कायमच पुढच्या पिढीसाठी आणि सध्या राजकारणात सक्रिय असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

- सुषमा स्वराज अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यांच्या मुलीने सर्व धार्मिक क्रिया केल्या.

- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अंत्यसंस्कारासाठी पोहोचले आहेत.

- बासुरी स्वराज आणि स्वराज कौशल यांनी सुषमा स्वराज यांना सल्यूट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

- सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला राजनाथ सिंह, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल यांनी खांदा दिला. 

- सुषमा स्वराज यांचं पार्थिव भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.

- कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांंनी सुषमा स्वराज यांना वाहिली श्रद्धांजली.

*भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अश्रू अनावर झाले तो क्षण... 

*माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही सुषमा स्वराज यांच्या पार्थिवांचं अंत्यदर्शन घेतलं. 

*राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. 

*सिनेअभिनेत्री आणि भाजप नेत्या हेमा मालिनी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 

*केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांनीही वाहिली श्रद्धांजली 

*कैलाश सत्यार्थी यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. 

सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात सक्रिय असणाऱ्या सुषमा स्वराज यांचा चाहता वर्गही कायम अनेकांना थक्क करुन जात असे. स्वराज या परराष्ट्र मंत्री असताना परदेशात कोणत्याही संकटात अडकलेल्या भारतीयांनी त्यांच्याशी ट्विटवरून संपर्क केल्यानंतरही त्या संवाद साधून ती समस्या सोडवायच्या. त्यामुळे जनतेत त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या होत्या.