किती ओव्हरअ‍ॅक्टिंग! ED ने ताब्यात घेताच मंत्री ओक्साबोक्शी रडले; नेमकं काय झालं? पाहा Video

Senthil Balaji Cry : छाती पकडून ओक्साबोक्शी रडताना एका मंत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. नेमकं झालं तरी काय?

Updated: Jun 14, 2023, 10:54 AM IST
किती ओव्हरअ‍ॅक्टिंग! ED ने ताब्यात घेताच मंत्री ओक्साबोक्शी रडले; नेमकं काय झालं? पाहा Video title=
tamil nadu electricity minister v senthil balaji ed inquiry started crying money laundering case video viral today Trending News on google

Senthil Balaji Video : ईडीने (ED) छापेमारी केल्यानंतर चांगल्या चांगल्याची हवा टाईट होते. द्रविड मुन्नेत्र कळघम नेते आणि तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना जेव्हा ईडीने ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांनी जबरदस्त ड्रामा केला. या ड्राम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (viral video) व्हायरल होतो आहे. जसं त्यांना गाडी बसवण्यात आलं ते रडायला लागले आणि छातीला हात लावून ओक्साबोक्शी रडता रडता ते गाडीच्या सीटवर खाली कोसळले आणि वेदनेने विव्हळत असायचा फुलटू ओव्हर अँटिंग पाहिला मिळाली. दरम्यान त्यांना छातीत वेदना होत असल्याने चेन्नईच्या ओमंडुरारमधील शासकीय रुग्णालयातील ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. (Senthil Balaji Arrested)

काय आहे नेमकं प्रकरण ?

कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी बालाजीच्या करूर निवासस्थानावर आणि राज्य सचिवालयातील त्यांच्या कार्यालयावर छापे मारले. याशिवाय करूरमधील त्यांचे भाऊ आणि जवळच्या साथीदाराच्या घरावरही ईडीने छापे टाकले. नोकरीसाठी पैसे घेतल्याचा घोटाळ्या प्रकरणी त्यांची चौकशी ईडीकडून सुरु आहे. बालाजी विरुद्धचा खटला DMK मध्ये जाण्यापूर्वी 2011 ते 2015 पर्यंत AIADMK च्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्री असताना केलेल्या आरोपांशी आहेत. (tamil nadu electricity minister v senthil balaji ed inquiry started crying money laundering case video viral today Trending News on google)

द्रमुकने केंद्रावर आरोप 

या कारवाईनंतर द्रमुकने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर विरोधी नेत्यांचा बदला घेण्यासाठी आयटी विभागासारख्या एजन्सीचा वापर केल्याचा आरोपही द्रमुकने केला आहे.

दरम्यान, तामिळानाडुचे आरोग्यमंत्री एम सुब्रमण्यन आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टालीन यांनी रुग्णालयात जाऊन सेंथिल बालाजी यांच्या तब्येतीची विचारपूस केली.