TATA Group च्या 'या' स्टॉकवर लाखोंच्या परताव्याची संधी; ब्रोकरेज हाऊसेसचा सल्ला

टाटा ग्रुपच्या या स्टॉकमध्ये ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

Updated: Jul 26, 2022, 12:31 PM IST
TATA Group च्या 'या' स्टॉकवर लाखोंच्या परताव्याची संधी; ब्रोकरेज हाऊसेसचा सल्ला title=

मुंबई : टाटा स्टील ही देशातील चार प्रमुख पोलाद उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे आणि कंपनीच्या एकूण देशांतर्गत पोलाद उत्पादनापैकी 18% वाटा आहे. ब्रोकरेज अहवालानुसार, गुंतवणूकदारांना स्टॉकमध्ये 70 टक्क्यांहून अधिक परतावा मिळू शकतो.

Tata Group Stock:टाटा स्टीलचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. कंपनीने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत टाटा स्टीलचा एकत्रित निव्वळ नफा 21% ने घटून 7,714 कोटी रुपये झाला आहे. 

कंपनीने सांगितले की, खर्च वाढल्याने नफा कमी झाला आहे. यामुळे गेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीला 9,768 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

टाटा स्टील ही देशातील चार पोलाद उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे आणि एकूण देशांतर्गत पोलाद उत्पादनात कंपनीचा वाटा 18% आहे. निकालानंतर ब्रोकरेज हाऊसने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. ब्रोकरेज अहवालानुसार, स्टॉक गुंतवणूकदारांना 70 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो.

कंपनीचे निकाल?

एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. जूनच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून रु. 63,698.15 कोटी झाले, जे मागील वर्षीच्या तिमाहीत रु. 53,627.66 कोटी होते.

स्टॉकवर दबाव

मंगळवारी टाटा स्टीलच्या स्टॉकवर दबाव दिसून आला. बीएसईवर स्टॉक 0.87 टक्क्यांनी घसरून 952.55 रुपयांवर आला. कंपनीची मार्केट कॅप रु 1,16,323.07 कोटी आहे.

Tata Steel वर विविध ब्रोकरेज हाऊसेसचा सल्ला

JP Morgan- Overweight
जागतिक ब्रोकरेज जेपी मॉर्गनने टाटा स्टीलचे ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवले आहे. त्यांनी स्टॉकवर 1400 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सोमवारी शेअर 960.90 रुपयांवर बंद झाला होता.. हा स्टॉक 46% पर्यंत परतावा मिळवू शकतो. कंपनीचे निकाल त्यांच्या अंदाजापेक्षा चांगले आहेत. ब्रोकरेजच्या मते, युरोपियन युनिटची कामगिरीही चांगली असल्याचे दिसून आले आहे आणि पुढे जाऊन जेव्हा स्टीलच्या किमती खाली येतील तेव्हा त्याचा थेट फायदा टाटा स्टीलला होईल.

Jefferies- Hold

जेफरीजने टाटा स्टीलचे होल्ड रेटिंग कायम ठेवले आहे. त्यांनी स्टॉकवर 830 रुपयांचे लक्ष्य कायम ठेवले आहे. 

Macquarie- Outperform

जगतिक ब्रोकरेज Macquarieने टाटा स्टीलवर आऊटपरफॉर्म रेटिंग दिली आहे. स्टॉकमध्ये गुंतवणूकीसाठी मॅक्वेरीने प्रति शेअर 1670 रुपये लक्ष्य दिले. FY23 च्या दुसऱ्या सहामाहीत कंपनीच्या नफ्यात घट अपेक्षित आहे.