'वंदे मातरम्'बद्दल तेजस्वी यादव यांचं वादग्रस्त ट्विट

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी वंदे मातरम् बद्दल वादग्रस्त ट्विट केलं आहे.

Updated: Aug 14, 2017, 05:22 PM IST
'वंदे मातरम्'बद्दल तेजस्वी यादव यांचं वादग्रस्त ट्विट  title=

पटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी वंदे मातरम् बद्दल वादग्रस्त ट्विट केलं आहे. या ट्विटमधून तेजस्वी यादव यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. १५ ऑगस्टला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वंदे मातरम् म्हणणं बंधनाकारक करण्यात आलं आहे. यावर तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे. यांच्यासाठी वंदे मातरम् म्हणजेच बंदे मारते हम असं ट्विट तेजस्वी यादव यांनी केलं आहे.

तेजस्वी यादव यांच्या या ट्विटवर यूजर्सनी मात्र मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. नववीनंतर तुम्ही वंदे मातरम् ऐकलंच नसेल. वंदे मातरम् चा असा अपमान करणं तुम्हाला शोभत नाही. अशा अनेक प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांच्या या ट्विटवर आल्या आहेत.