रेपो रेट वाढल्याने कर्जाचे हप्ते वाढणार; परंतू या 3 बँकांकडून ग्राहकांना खूशखबर

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी रेपो दरात 0.50 टक्के किंवा 50 बेस पॉइंट्सची वाढ जाहीर केली. रेपो दर आता 4.9 टक्के झाला आहे. 

Updated: Jun 9, 2022, 09:44 AM IST
रेपो रेट वाढल्याने कर्जाचे हप्ते वाढणार; परंतू या 3 बँकांकडून ग्राहकांना खूशखबर title=

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी रेपो दरात 0.50 टक्के किंवा 50 बेस पॉइंट्सची वाढ जाहीर केली. रेपो दर आता 4.9 टक्के झाला आहे. देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली आहे.

रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. या घोषणेनंतर, आयसीआयसीआय बँक, येस बँक इत्यादी अनेक खाजगी बँकांनी मुदत ठेवींवरील (F.D) व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे.

ICICI बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ICICI बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर 2 कोटींवरून 5 कोटी रुपयांपर्यंत बदलले आहेत. ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3 टक्के ते 6.5 टक्के व्याज मिळते. फिक्स्ड डिपॉझिटवरील नवीन व्याजदर 7 जून 2022 पासून लागू होणार आहेत.

खाजगी बँक RBL ने त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातही बदल केला आहे. RBL बँक आता वेगवेगळ्या कालावधीसाठी 3.25 टक्के ते 6.50 टक्के व्याज देते. फिक्स्ड डिपॉझिटवरील नवीन व्याजदर 8 जून 2022 पासून लागू होतील.

खासगी क्षेत्रातील बँक येस बँकेनेही त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या एफडीवर 3.25 ते 6.40 पर्यंत व्याज मिळते. नवीन व्याजदर 6 जून 2022 पासून लागू झाले आहेत.

आरबीआयच्या व्याजदरात 0.50 टक्के वाढ झाल्याच्या घोषणेनंतर, सलग दोनदा रेपो दरात वाढ झाल्यामुळे एफडीवरील व्याजदर पुन्हा वाढतील, अशी अटकळ बांधली जात होती. FD व्याजदरात 90 बेसिस पॉइंट्सची वाढ झाल्यास व्याजदर 5.5 टक्क्यांवरून 6.4 टक्के होईल. या आधारावर 5 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची FD केल्यास तुम्हाला 5958 रुपये अतिरिक्त व्याज मिळेल.