Corona Third Wave : देशात एका दिवसात कोरोनाचे दीड लाख रुग्ण, PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक

देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता

Updated: Jan 9, 2022, 02:28 PM IST
Corona Third Wave : देशात  एका दिवसात कोरोनाचे दीड लाख रुग्ण,  PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक title=

PM Modi will review Corona situation in country today: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या 24 तासात कोविडचे 1 लाख 59  हजार 632 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील अनेक राज्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी अनेक कठोर निर्बंध लादले आहेत, मात्र संसर्ग थांबण्याऐवजी वाढतच आहे. 

देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत (Corona Third Wave) झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi) रविवारी दुपारी साडेचार वाजता उच्चस्तरीय आढावा बैठक घेणार आहेत. रविवारी सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात दीड लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. WHO नेही याबाबत इशारा दिला आहे.

देशातील अनेक राज्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी अनेक कठोर निर्बंध लादले आहेत, मात्र संसर्ग थांबण्याऐवजी वाढतच आहे. गेल्या 24 तासांत कोविडचे 1,59,632 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 40,863 रुग्ण बरे झाले आणि 327 लोकांचा मृत्यू झाला. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 5,90,611 वर पोहोचली आहे. चांगली गोष्ट म्हणजे आतापर्यंत 3,44,53,603 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशात पहिला आणि दुसरा डोस मिसळून 1.51 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर
राज्यात गेल्या 24 तासांत वाढले 40 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात 1 लाख 41हजार  492 कोरोना आणि 441 ओमायक्रॉनचे सक्रीय रुग्ण आहेत. त्यातच आता ऑक्सिजनची मागणी वाढ लागली आहे. (demand for oxygen in Maharashtra) त्यामुळे राज्य सरकार कोरोनाबाबतचे निर्बंध लागू केले आहेत. या नियमावलीनुसार राज्य सरकारने निर्बंध आणखी कडक केले आहेत. तसेच या नियमावलीची अंमलबजावणी ही आज मध्यरात्रीपासून (10 जानेवारी) लागू करण्यात येणार आहे. 

राज्यात रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे. तसंच सुधारित नियमावलीत शाळा, महाविद्यालय, हॉटेल, मॉल्स, शॉपिंग मॉल, मैदानं, क्रीडांगणांसाठी ही निर्बंध लावण्यात आले आहेत.