....म्हणून 'या' मुलीला मिळणार मोदींसोबत 'चांद्रयान २'चं थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी

७ सप्टेंबरच्या मुहूर्तावर 'चांद्रयान २' चंद्रावर उतरणार आहे.

Updated: Sep 2, 2019, 11:29 AM IST
....म्हणून 'या' मुलीला मिळणार मोदींसोबत 'चांद्रयान २'चं थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी title=

लखनऊ : समस्त देशवासियांचे लक्ष 'चांद्रयान २' कधी चंद्रावर उतरेल या कडे लागले आहे. ७ सप्टेंबरच्या मुहूर्तावर 'चांद्रयान २' चंद्रावर उतरणार आहे. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा ऐतिहासिक क्षण अनुभवणार आहेत. इस्त्रोमध्ये त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत उत्तर प्रदेशची राशी वर्माला हा ऐतिहासिक क्षण आयुष्यभरासाठी आपल्या डोळ्यात साठवून ठेवता येणार आहे. 

सध्या राशी १० वी इयत्तेत शिकत आहे. तिचे वडील राजकुमार वर्मा एक शेतकरी आहेत. त्याचप्रमाणे तिची आई एका प्राथमिक शाळेत शिक्षीका आहे. दोघे गावात राहत असल्यामुळे त्यांच्या पुढे मोठा प्रश्न होता, तो म्हणजे त्यांच्या मुलीच्या भवी आयुष्याचा. चांगल्या शिक्षणासाठी राशी तिच्या अत्याकडे राहते. त्याचप्रमाणे शहरातील एका नामवंत शाळेत शिक्षण घेत आहे. 

यंदा  विज्ञान क्षेत्रात वाढत असलेली मुलांची आवड पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका विज्ञान स्पर्धेचं आयोजन केले होते. देशातील विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या स्पर्धेद्वारे सर्वात जास्त क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थांना श्रीहरिकोटा येथे ७ डिसेंबर रोजी चांद्रयान-२ ची लँडिंग पाहण्यासाठी घेवूण जाणार असल्याचे 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी सांगितले होते.

आठवी ते बारावीच्या एकुण १५० विद्यार्थांनी या स्पर्धेत भाग घेतला.  त्यापैंकी राशीच्या वाट्याला यश आले आहे. त्यामुळे तिच्या घरात सुद्धा आनंदाचे वातावरण आहे. या स्पर्धेमध्ये १० मिनिटांमध्ये २० प्रश्नांचे उत्तर द्यायचे होते.