'या' आमदाराने केली फेरीवा-याला मारहाण

पद आणि सत्ता एखाद्या व्यक्तीला गर्व वाटण्यास सुरुवात होते त्यावेळी काय होतं याचं उदाहरण पश्चिम बंगालमध्ये पहाण्यास मिळालं. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 16, 2017, 10:21 PM IST
'या' आमदाराने केली फेरीवा-याला मारहाण title=

कोलकाता : पद आणि सत्ता एखाद्या व्यक्तीला गर्व वाटण्यास सुरुवात होते त्यावेळी काय होतं याचं उदाहरण पश्चिम बंगालमध्ये पहाण्यास मिळालं. 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने एका फेरीवाल्याला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. 

पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील काशीपूर येथे हा प्रकार घडला आहे. काशीपूरमध्ये अतिक्रमण हटविण्याचं काम सुरु होतं. त्याचवेळी तेथे टीएमसी आमदार स्वप्न कुमार बेलथरिया यांनी एका फेरीवाल्याला मारहाण केली. 

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्या फेरीवाल्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. 

या घटनेसंदर्भात प्रसारमाध्यमांनी बेलथरिया यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, मी कुठल्याही फेरीवाल्याला ओळखत नाही आणि असं काही झाल्याचंही मला माहिती नाही.