देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळाला भूकंपाचा धक्का

सध्या हाती आलेल्या माहितीनुसार...

Updated: Jun 5, 2020, 10:16 AM IST
देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळाला भूकंपाचा धक्का  title=
संग्रहित छायाचित्र

बंगळुरू : सध्याच्या घडीला कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाऊनचा काळ सुरु आहे. काही भागांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांना मोठ्या प्रमाणात शिथिलता दिलेली आहे. त्यामुंळं पुन्हा एकदा काही चक्र फिरु लागली आहेत. यामध्ये पर्यटन व्यवसायाचाही समावेश आहे. पण, कोरोना महामारीतून सावरत अतानाच देशातील एका लोकप्रिय पर्यटन स्थळाला आता भूकंपाचा हादरा बसल्याचं वृत्त आहे. 

देश आणि परदेशातील पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण असणाऱ्या कर्नाटक राज्यातील हंपी येथे शुक्रवारी सकाळी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. झारखंडमधील जमशेदपूर येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास ४.७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. तर, दुसरीकडे याच वेळी हंपी या पर्यटनस्थळीसुद्धा ४.० इतक्या तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के जाणवले. जमशेदपूरपासून जवळपास २००० किलोमीटर इतक्या अंतरावर असणाऱ्या हंपीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या माहितीवर National Centre of Seismologyकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही भुकंपांमध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्त हानी झालेली नाही. 

हंपीविषयी सांगावं तर जवळपास ७ व्या शतकातील स्थापत्यशास्त्राची अनेक अमूल्य उदाहरणं आणि वास्तूशिल्प येथे पाहायला मिळतात. तर, जमशेदपूर हे वाघ आणि बिबट्यांचा वावर असणाऱ्या Tata Steel Zoological Parkसाठी ओळखलं जातं. 

हंपी

दिल्लीत भूकंपांची संख्या वाढली... 

दिल्लीतील एनसीआर क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या दुसऱ्याच दिवशी जमशेदपूर आणि हंपीमध्येही धरणीकंपाचे हादरे जाणवले. एप्रिल महिन्यापासून दिल्ली आणि आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळं येत्या काळात या भागामध्ये एखाद्या मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.