Viral Photo | या फोटोत लपलाय खतरनाक शिकारी; तुम्हाला सापडला का?

उंच पहाडांवर शिकार करण्याची क्षमता या खतरनाक प्राण्यात असते

Updated: Jul 14, 2021, 12:43 PM IST
Viral Photo | या फोटोत लपलाय खतरनाक शिकारी; तुम्हाला सापडला का?  title=

नवी दिल्ली : स्नो लेपर्ड म्हणजेच बिबट्याचा हिमालयातील भाऊ होय. या हिम बिबट्या असंही म्हणतात. हा बिबट्या हिमालयाच्या थंड प्रदेशात राहतो. परंतु शिकारीची क्षमता जंगली बिबट्या सारखी प्रचंड हिस्र आणि खतरनाक असते. उंच पहाडांवर शिकार करण्याची या हिम बिबट्याची क्षमता कमालीची असते. त्याच्या रंग रुपामुळे तो पहाडांमध्ये सहजासहजी दिसून येत नाही. सोशलमीडियावरील एका फोटोमध्ये बिबट्याला शोधणं म्हणजेच भुशात सुई शोधण्यासारखं आहे.

काही दिसले का?

हा फोटो वन अधिकारी सुधा रमन यांनी सोशलमीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलंय की, येथे कोन आहे? शोधण्याचा प्रयत्न करा? हा फोटो रिऍन क्रॅगुन यांनी क्लिक केला आहे.

सोशलमीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक लोकं बिबट्या सापडल्यानंतर पोस्ट रिशेअर करीत आहेत. 

Image