अरे याला सुट्टी द्या... माहेरी गेलेल्या पत्नीसाठी दाजीबाने लिहिलेलं पत्र व्हायरल

बायकोला माहेरून आणण्यासाठी दाजीबाजा खटाटोप! पत्र वाचून तुम्ही म्हणाल, अरे याला सुट्टी द्या...

Updated: Aug 4, 2022, 05:11 PM IST
अरे याला सुट्टी द्या... माहेरी गेलेल्या पत्नीसाठी दाजीबाने लिहिलेलं पत्र व्हायरल title=

नवी दिल्ली : सुट्टी घेण्यासाठी कोणी मुद्दाम आजारी पडतं किंवा काही ना काही कारण दिली जातात. पण एका कर्मचाऱ्याने जे कारण लिहिलं आहे ते वाचून तुम्हालाही त्याची दया येईल. त्याचं पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. हे पत्र वाचून तुम्ही म्हणाल अरे याला खरंच सुट्टी द्या. नक्की या कर्मचाऱ्याने पत्रात काय लिहिलं आहे जाणून घेऊया. 

ऑफिसमधील कर्मचाऱ्याला सुट्टी मिळत नसल्याने त्याने खरं कारण सांगत अखेर पत्र लिहिलं. हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. हा अधिकारी उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील बीएसए ऑफिसमधील क्लार्क असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या पत्राची खूप चर्चा होत आहे. त्याला तीन दिवसांची सुट्टी हवी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार या क्लर्कचं नाव शमशाद अहमद आहे. त्याने तीन दिवस सुट्टी देण्याची पत्रतून अधिकाऱ्यांना विनंती केली. एका वर्षात सुट्टी न मिळाल्याने त्याची पत्नी नाराज झाली. ती रूसून आपल्या मुलांसोबत माहेरी निघून गेली. त्यामुळे या क्लर्कला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. 

महोदय, पत्नीला माहेरून आणण्याच्या रजेच्या अर्जासंदर्भात, वरील विषयाच्या संदर्भात आपल्या निदर्शनास आणून द्यायाचं आहे की, पत्नीशी प्रेमातून काही वाद झाले होते. या वादामुळे 

पत्नी मोठी मुलगी व दोन मुलांसह माहेरी गेली असून, त्यामुळे अर्जदार मानसिकदृष्ट्या दुखावला आहे. त्याला त्याच्या माहेरून आणण्यासाठी गावी जायचं आहे. त्यामुळे मला सुट्टी मिळावी ही विनंती. कृपया तीन दिवसांची सुट्टी मंजूर करून मला गावी जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्याने केली आहे.

शमशाद यांनी या पूर्वी देखील अनेक सुट्ट्यांचे अर्ज केले मात्र सुट्टी काही मंजूर होईना. आता मात्र सहनशक्ती संपली. त्यामुळे अखेर सत्य घटना सांगून त्यांनी अधिकाऱ्यांनी सुट्टी मंजूर करण्याची विनंती केली. कर्मचाऱ्याच्या सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.