Trending News : अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा World Record, इतिहासात जे कोणालाही जमलं नाही ते त्याने...

Trending News : या कुटुंबाने ऑगस्ट 2023 स्कॉटलंडमधील त्यांचं घर भाड्याने दिलं आणि ते देशभ्रमंतीला निघाले. त्यांच्यासोबत 2 वर्षाच्या चिमुकल्याही या प्रवासाला निघाला. हे कुटुंब श्रीलंका आणि मालदीवला गेलं त्यानंतर...      

नेहा चौधरी | Updated: Jan 29, 2024, 11:33 AM IST
Trending News : अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा World Record, इतिहासात जे कोणालाही जमलं नाही ते त्याने... title=
Trending News World Record of just 2 year old baby what no one has achieved in history he reach mount everest base camp

Viral Trending News : आई वडिलांसोबत देशभ्रमंतीला निघालेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याने जे केलं त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. या इतिहास रचत विश्वविक्रम करुन सर्वांना आश्चर्यचकित केलंय. हा चिमुकला ब्रिटनचा असून त्याच नाव कार्टर डॅलस असं आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारा कार्टर हा जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरला आहे. 31 वर्षीय वडील रॉस आणि 31 वर्षीय आई जेडसोबत त्याने हा इतिहास रचला आहे. वडिलांच्या पाठीवर बसून त्याने हा ट्रॅक पूर्ण करुन सर्वांना सुख धक्का दिला आहे. (Trending News World Record of just 2 year old baby what no one has achieved in history he reach mount everest base camp)

रॉस आणि त्याची पत्नी जेड यांनी त्यांचे स्कॉटलंडमधील घर ऑगस्ट 2023 मध्ये भाड्याने दिलं आणि ते देशभ्रमंतीला निघाले. हे कुटुंब आधी भारतात आले त्यानंतर श्रीलंका आणि मालदीवला गेले. गुआसागोमधील हे कुटुंब वर्षभराच्या आशियाच्या ट्रिपवर निघाला आहे. त्यानंतर रॉस आणि जेड यांनी 25 ऑक्टोबरला नेपाळमधील समुद्रसपाटीपासून 17,598 फूट उंचीवर असलेल्या दक्षिणेकडील शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली. मिरर यूकेच्या अहवालानुसार, कार्टर पूर्वी हा विक्रम झेक प्रजासत्ताकमधील एका 4 वर्षांच्या मुलाने केला होता.

mounteverestbasecamp

मुलाचं कौतुक करताना वडील रॉस म्हणाले की, सगळ्या ट्रॅकमध्ये आमच्या दोघांपेक्षा त्याने सर्व गोष्टी अतिशय काटेकोर आणि प्रामाणिकपणे केली. आम्हा दोघांना उंचीवर गेल्यावर थोडा त्रास झाला पण कार्टर हे सगळं मस्त एन्जॉय करत होता. बेस कॅम्पला जाण्यापूर्वी तिथल्या दोन स्थानिक डॉक्टरांनी त्याच चेक केलं होतं. अगदी बेस कॅम्पला जाण्यासाठी त्याची प्रकृती योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याची रक्ताची तपासणीही करण्यात आली होती. ते टेस्ट रिपोर्ट पाहून तर आम्ही चकितच झालो. आम्हाला दोघांपेक्षा त्याचे रिपोर्ट खूप चांगले होते. 

मग काय आम्ही ट्रॅकवर जाण्यासाठी तयारी करु लागलो. आम्ही फूड जॅकेट आणि दोन स्लीपिंग बॅग विकत घेतल्या. कुठलही प्लॅनिंग न करता आम्ही ट्रॅकवर जाण्याचा निर्णय घेतला होता. 'काठमांडूला पोहोचल्यानंतर 24 तासांच्या आत आम्ही मिशनवर निघालो.' आपलं कुटुंब या ट्रॅकसाठी पूर्णपणे तयार असल्याचा त्यांचा विश्वास होता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हे संपूर्ण कुटुंब बर्फाप्रदेशातील थंड पाण्याचा तलावात आंघोळ करत होते. त्यांनी नियमितपणे श्वासोच्छवासाचे व्यायाम करुन हे मिशन पूर्ण केलं.