श्वानाला कारमध्ये बंद करुन फॅमिली गेली ताजमहल पाहिला, तडफडून मृत्यू... Video पाहून लोक भडकले

पाळिव श्वानाला कारमध्ये बंद करुन एक फॅमिली ताजमहल पाहिला गेली. इथे श्वानाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी या कुटुंबावर संताप व्यक्त केला आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 3, 2023, 06:04 PM IST
श्वानाला कारमध्ये बंद करुन फॅमिली गेली ताजमहल पाहिला, तडफडून मृत्यू... Video पाहून लोक भडकले title=

Trending Story : उत्तर प्रदेशमधल्या आगरा (UP Agra) इथल्या ताजमहल परिसरात पार्गिंकमध्ये उभ्या असलेल्या कारमधअये पाळिव श्वानाचा मृतदेह आढळून आला. श्वानाच्या मालकाने त्याला कारमध्येच बंद केलं  (Dog Lock in Car) आणि संपूर्ण कुटुंबासोबत तो ताजमहल पाहिला गेला. पण कडक उन्हामुळे मुक्या प्राण्याचा तडफून मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला असून या कुटुंबाविरोधात कठोर कारवाईची मागणी केलीजात आहे. 

ही घटना ताजमहलच्या पश्चिम गेट पार्किंगजवळची आहे. हरियाणातलं एक कुटुंब कारने ताजमहल पाहण्यासाठी आलं होतं. त्यांच्याबरोबर त्यांचं पाळिव श्वानही होतं. पण त्याला बरोबर न नेत्या कुटुंबाने श्वानाल कारमध्येच ठेवलं. त्यानंतर कारच्या काचा बंद करून संपूर्ण कुटुंब ताजमहल पाहण्यासाठी गेलं. कुटुंब ताजमहल पाहण्यात व्यस्त असताना कारमध्ये श्वानाच कडक उन्ह आणि घुसमटून मृत्यू झाला. 

मोकळ्या जागेत कार उभी होती. दुपारची वेळ असल्याने कडक ऊन होतं.  कडक उन्हामुळे कार तापली आणि कारमध्ये असलेल्या श्वानाचा दम घुसमटायला लागला. या दरम्यान, त्याच्या गळ्यातील साखळी हँडब्रेकमध्ये अडकली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पार्किंगमध्ये असलेल्या काही लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी कारजवळ जाऊन पाहिलं असता श्वान निपचित पडला होता. काही लोकांना याचा व्हिडिओ बनवला आणि तो ट्विटरवर व्हायरल केला. घटनेची माहिती मिळताच पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले. 

कारवाईचे आदेश
व्हिडिओ सोशल मीडियावर झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून श्वानाच्य मालकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी आगरा पोलिसांनी एक ट्विटही केलंही आहे. गैरजबाबदार असणाऱ्या कुटुंबावर कारवाई  केली जाईल असं या ट्विटमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे. श्वानाचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला असून हरियाणातील पर्यटक कुटुंबाची चौकशी केली जात आहे. 

लोकांचा संताप
कारमध्ये पाळिव श्वानाचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्या कुटुंबावर कारवाईची मागणी केली आहे. एका युजरने म्हटलंय, लोकं इतकी गैरजबाबदार कशी असू शकतात.  तर एका युजरने हा मुक्या प्राण्यांवर अत्याचार असून या कुटुंबावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं म्हटलंय.