Viral Video : होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं पुन्हा भान हरपलं, बाइकवरच रोमान्स... व्हिडीओ व्हायरल

Couple Romance on Biike Video : होळीचा (Rang Panchami 2023) रंग एका प्रेमी युगुलावर जास्त चढलेली दिसला. प्रेमाच्या रंगात हे दोघे दिवसाढवळ्या बाइकवर खुल्लम खुल्ला रोमान्स करताना शहरात दिसून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Updated: Mar 11, 2023, 12:58 PM IST
Viral Video : होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं पुन्हा भान हरपलं, बाइकवरच रोमान्स... व्हिडीओ व्हायरल title=
trending video Couple Romance kissing on Bike Viral Video on social media

Couple Romance on Bike Viral Video : बुरा न मानो, होली है...! असं होळीला  म्हटलं जातं. अख्खा देश रंगाच्या उत्सवात न्हावून निघाला होता. प्रत्येकावर होळीचा रंग (Rang Panchami 2023) चढलेला दिसला. अशातच एक प्रेमी युगुलावर प्रेमाचा (Romance Video) रंग चढलेला दिसला. होळीच्या दिवशी हे प्रेमवीर दिवसा बाइकवर एकमेकांच्या मिठीत रमले होते. त्यांचा हा बाइकवरील रोमान्स  (video viral on social media) अख्ख शहर पाहत होतं. या वर्षाची सुरुवातच कधी बाइक, तर कधी स्कुटी तर कधी कारचा रूफ टॉपवर कपल रोमान्स (boyfriend girlfriend video) करताना दिसून आले. सोशल मीडियावर हे व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहेत. आता अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. (trending video)

हद्द केली राव! 

व्हिडीओमध्ये एक तरुण बुलेट चालवताना दिसत आहे. तर तरुणी पेट्रोल टाकीवर बसून त्या तरुणाला मिठी मारून बसली आहे. अधूनमधून ती तरुणी तरुणाला किस (couple kissing video) करताना दिसतं आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांनीही हेल्मेट घातलेला नव्हता. होळीचा रंग या दोघांवर चढला होता असं दिसतं होतं. होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं मर्यादा ओलांडल्या आहेत. अश्लिलतेचं असं प्रदर्शन पाहून नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. बाइकवर कपलचे हे चाळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. (trending video Couple Romance kissing on Bike Viral Video on social media)

कुठलीही आहे घटना?

हा व्हिडीओ ट्वीटरवर Jitesh Jethanandani या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील जयपूरमधील आहे. जो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 

पहिलाच व्हिडीओ नाही...

खरं तर ही पहिलीच घटना नाही. असे अनेक घटना गेल्या काही महिन्यात समोर आल्या आहेत. पोलिसांचा धाक राहिला नाही असं काहीस चित्र दिसतं आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच अजमेर जिल्ह्यातील एक व्हिडीओ समोर आला होता. त्यातही कपल बाइकवर रोमान्स करताना दिसले होते. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. बाइकवर असे रोमँटिक स्टंट करणे हा कपल सोबत रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांसाठी घात ठरु शकतात.