कार वॉशिंग मशिनमध्ये अडकला क्लिनर, थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

बापरे! क्लिनर अडकला कार वॉशिंग मशिनमध्ये, अन् जे झालं ते पाहुन तुम्हालाच धक्का बसला, पाहा VIDEO 

Updated: Nov 5, 2022, 07:28 PM IST
कार वॉशिंग मशिनमध्ये अडकला क्लिनर, थरकाप उडवणारा VIDEO आला समोर  title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. या फोटो (Photo) आणि व्हिडिओद्वारे (Video) प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. तर काही व्हिडिओ हे खुपच धक्कादायक असतात. हे व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसत असतो.आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही धक्का बसेल.  

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कार क्लिनर कार वॉशिंग मशिनमध्ये अडकल्याचे दिसत आहे. ही कार वॉशिंग मशिन अचानक सुरू होते, त्यानंतर कार क्लिनर त्या मशिनमध्ये अटकून फिरू लागतो. सुरूवातीला मशीनचा वेग कमी असतो, त्यानंतर तो वेग वाढतो. हा वेग वाढल्यानंतर क्लिनरची अवस्था बिकट होते. 

व्हिडिओत काय? 

व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता की, ती व्यक्ती मशीनच्या मध्यभागी अडकली आहे आणि मशीन चालू होते सुरुवातीला मशीन हळूहळू फिरवते, नंतर त्याचा वेग वाढतो. या वेगात ती व्यक्ती फिरत असत. यामुळे त्याची अवस्था खुप वाईट होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. 

हा मजेदार व्हिडिओ @OTerrifying नावाच्या आयडीसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 6 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने 'हे ​​कसे झाले' असे लिहिले आहे, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की 'मला वाटत नाही की तो अडकला आहे, तो नाचत आहे'. त्याचप्रमाणे काही यूजर्स हा व्हिडिओ पाहून हसत-हसत आहेत.

दरम्यान हा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media)  प्रचंड व्हायरल होत आहे.